Corona Breaking ; हिंगोलीत शनिवारी सहा पॉझिटिव्ह

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 जुलै 2020

हिंगोली जिल्ह्यात सहा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याचा अहवाल शनिवारी (ता.चार) रात्री साडेआठच्या सुमारास जिल्हा प्रशासनास प्राप्त झाला. यामध्ये हिंगोली शहरातील एक तर सेनगाव तालुक्‍यातील एक आणि वसमत तालुक्यातील चौघांचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या २९५ तर उपचार सुरू असलेले ४७ रुग्ण आहेत. तसेच २४८ रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत. 

हिंगोली ः जिल्ह्यात सहा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याचा अहवाल शनिवारी (ता.चार) रात्री साडेआठच्या सुमारास जिल्हा प्रशासनास प्राप्त झाला. यामध्ये हिंगोली शहरातील एक तर सेनगाव तालुक्‍यातील एक आणि वसमत तालुक्यातील चौघांचा समावेश आहे. दररोज रुग्णांची वाढ होत असल्यामुळे जिल्हावासियांची धाकधूक वाढली आहे. 

हिंगोलीतील रिसाला बाजार येथील एका ७६ वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाली आहे. सदरिल रुग्ण बाहेरगावाहून येण्याचा पूर्व इतिहास नाही. तसेच मकोडी (ता.सेनगाव) येथील एक २५ वर्षीय महिला ताप व पोटात दूखण्याच्या लक्षणामुळे जिल्हा रुग्णालयात भरती झाली होती. तिला कोरोनाची लागण झाली आहे. तर उर्वरित चार रुग्ण वसमत तालुक्यातील आहेत. ज्यात पहिला रुग्ण २७ वर्षीय पुरुष जो वसमत येथे हैदराबाद येथून अंत्यविधीसाठी आला होता. दुसरा रुग्ण ३० वर्षीय पुरुष रिधोरा येथील आर्मीमधील जवान आहे. तो नागालॅँड येथून परतला आहे. तर अन्य दोन महिला आहेत. ज्या (वय ४५) (वय १६) रा.टाकळगाव येथील आहेत ज्या पनवेल येथून परतल्या आहेत.   

हेही वाचा - हिंगोलीत लॉकडाऊन काळात 3983 गरोदर मातांची नोंदणी

२४८ रुग्ण आतापर्यंत बरे 
हिंगोली जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या २९५ तर उपचार सुरू असलेले ४७ रुग्ण आहेत. तसेच २४८ रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत. 

हेही वाचा - Corona Breaking ; शनिवारी परभणी जिल्ह्यात कोरोनाचे दहा रुग्ण

परभणी जिल्ह्यात कोरोनाचे दहा रुग्ण आढळले 
परभणी ः जिल्ह्यात कोरोना संसर्गित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. शुक्रवारी सात, तर शनिवारी (ता. चार) दहा रुग्णांची भर पडली. जिल्ह्यात आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १४२ वर गेली आहे. परभणी जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळण्यास सुरवात झाल्यापासून एक दिवसाआड किंवा दोन दिवसांआड एखादा रुग्ण सापडत; परंतु गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात कोरोनाने कहर सुरू केला आहे. दररोज रुग्ण आढळून येत असल्याने परभणीकरांची धडधड वाढली आहे. परभणी जिल्ह्यात आतापर्यंत १४२ रुग्णांची नोंद झाली आहे. शनिवारी (ता. चार) परभणी शहरात सात व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आल्या आहेत. पाथरी, करडगाव (ता. परभणी), महागाव (ता. पूर्णा) येथे कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मागील तीन दिवसांपासून संचारबंदी लागू केली आहे. जिल्ह्यात एकूण १४२ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यापैकी शुक्रवारपर्यंत (ता. तीन) ९८ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले. त्यात आता शनिवारी आणखी दहा रुग्णांची भर पडली. आता कोरोना कक्षात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ४० एवढी झाली आहे. चारजणांचा मृत्यू झाला आहे.

हिंगोली कोरोना मीटर 
 एकूण पॉझिटिव्ह - २९५ 
उपचार सुरू - ४७ 
उपचार घेत घरी परतलेले - २४८ 
मृत्यू - शून्य 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Breaking; Six positive on Saturday in Hingoli, hingoli news