esakal | Corona Breaking ; शनिवारी परभणी जिल्ह्यात कोरोनाचे दहा रुग्ण 
sakal

बोलून बातमी शोधा

corona

परभणी जिल्ह्यात एकूण १४२ कोरोना बाधिताची नोंद झाली आहे. त्यापैकी शुक्रवार (ता.तीन) पर्यंत ९८ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले. त्यात आता शनिवारी अजून दहा रुग्णांची भर पडली. आता कोरोना कक्षात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ४० एवढी झाली आहे. तर चार जणांचा मृत्यू झाला आहे. 

Corona Breaking ; शनिवारी परभणी जिल्ह्यात कोरोनाचे दहा रुग्ण 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

परभणी ः जिल्ह्यात कोरोना संसर्गीत रुग्णाच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. शुक्रवारी सात तर शनिवारी (ता.चार) तब्बल दहा रुग्णांची भर पडली आहे. जिल्ह्यात आता कोरोना बाधित रुग्णांची संख्या १४२ वर गेली आहे.

परभणी जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाल्यापासून एक दिवसाआड किंवा दोन दिवसाआड एखादा रुग्ण सापडत असे. परंतू, गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात कोरोनाने कहर सुरू केला आहे. दररोज रूग्ण आढळून येत असल्याने परभणीकरांची धडधड वाढली आहे. परभणी जिल्ह्यात आतापर्यंत १४२ रुग्णांची नोंद झाली आहे. शनिवारी (ता.चार) परभणी शहरात सात व्यक्ती कोरोना बाधित आढळून आल्या आहेत. तर पाथरी, करडगाव (ता.परभणी), महागाव (ता.पूर्णा) अश्या पध्दतीने कोरोना रुग्ण सापडले आहेत. दरम्यान, कोरोना विषाणुचा प्रार्दुभाव थांबविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मागील तीन दिवसांपासून संचारबंदी लागू केलेली आहे.

हेही वाचा - दहा हजारांचे मिळणार मुदती कर्ज, कोणाला ते वाचा...

चाळीस रुग्णांवर उपचार सुरू
जिल्ह्यात एकूण १४२ कोरोना बाधिताची नोंद झाली आहे. त्यापैकी शुक्रवार (ता.तीन) पर्यंत ९८ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. ४० रुग्ण उपचार घेत आहेत. त्यात आता शनिवारी अजून दहा रुग्णांची भर पडली. आता कोरोना कक्षात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ४० एवढी झाली आहे.

हेही वाचा - परभणीतील भाजप नेत्यांचे प्रदेशावरील वजन घटले, का ते वाचा...

रुग्ण आढळलेले गाव व परिसर प्रतिबंधित
महागाव (ता. पूर्णा) येथील २९ वर्षीय महिला, परभणी शहरातील महात्मा फुले नगरमधील ३७ वर्षीय पुरुष, जवाहर कॉलनीतील ३४ वर्षीय पुरुष, करडगाव येथील २१ वर्षीय युवक, वैभव नगरमधील ३२ वर्षीय पुरुष, गणेश नगरमधील ३० वर्षीय महिला, गंगापुत्र कॉलनीतील ५९ वर्षीय महिला, २५ वर्षीय आणि ३४ वर्षीय पुरुष तर पाथरी शङरातील ५७ वर्षीय महिला कोरोना विषाणु संसर्गित आढळून आली आहे. त्यामुळे ज्या गावात किंवा परिसरात रुग्ण आढळून आले आहेत. तो भाग प्रतिबंधित केला जात आहे.

नागरिकांचा संपर्क करावा लागणार कमी
गेल्या आठवड्यापासून परभणी शहरासह जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे रुग्ण आढळून येत आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील नागरिकांचा एकमेकांशी संपर्क तोडावा लागणार आहे. त्यासाठी काही कठोर निर्णय देखील घेण्याचा जिल्हा प्रशासना प्रयत्न करत आहे. गेल्या तीन दिवसापासून लागू करण्यात आलेली संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्या आधी शहरातील बाजारपेठ सुरु करण्यात आली होती. जशी बाजरपेठ सुरू झाली तशी रुग्ण संख्या वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी आता प्रशासनाला कडक पावले उचलून नागरिकांचा संपर्क कमी करावा लागणार आहे या विचारात प्रशासन असल्याचे समजते.