मराठवाड्यात कोरोनाचा प्रसार पुन्हा वाढला; बीडमधील स्थिती चिंताजनक

औरंगाबाद जिल्ह्यात ६६ कोरोनाबाधित आढळले. त्यात शहरातील १३, ग्रामीण भागातील ५३ जण आहेत
मराठवाड्यात कोरोनाचा प्रसार पुन्हा वाढला; बीडमधील स्थिती चिंताजनक
Updated on

औरंगाबाद: मराठवाड्यात शुक्रवारी (ता. २५) दिवसभरात कोरोनाचे ४११ नवे रुग्ण आढळले. त्यात बीडमधील सर्वाधिक १७६ रुग्णांचा समावेश आहे. औरंगाबादेतील ६६, लातूर ५०, उस्मानाबाद ४६, परभणी ३६, जालना २३, नांदेड आठ, हिंगोलीतील सहा रुग्ण आहेत. उपचारादरम्यान आणखी १८ जणांचा मृत्यू झाला. त्यात बीडमध्ये ८, जालना ४, औरंगाबाद ३, परभणी- लातूर- उस्मानाबादेतील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

औरंगाबादेत ६६ बाधित -
औरंगाबाद जिल्ह्यात ६६ कोरोनाबाधित आढळले. त्यात शहरातील १३, ग्रामीण भागातील ५३ जण आहेत. रुग्णांची संख्या १ लाख ४५ हजार ८४७ वर पोचली. शहरातील २० तर ग्रामीण भागातील ९२ असे ११२ रुग्ण बरे झाले. आजपर्यंत १ लाख ४१ हजार ५८२ रुग्ण बरे झाले आहेत.

मराठवाड्यात कोरोनाचा प्रसार पुन्हा वाढला; बीडमधील स्थिती चिंताजनक
वक्फची जमीन हडपणाऱ्यांवर गुन्हे; बोर्डाच्या बैठकीतील निर्णय

सध्या ८५६ जणांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, आणखी तिघांचा मृत्यू झाला. त्यात मोंढा गंगापूर येथील पुरुष (वय ४४), वैजापूर येथील महिला (६५), चिंचोली (ता. कन्नड) येथील महिलेचा (४६) समावेश आहे. आजपर्यंत ३ हजार ४०९ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Marriage Fraud
Children of endlife-Affected Farmers from Ardhapur Taluka Pay an Inspiring Visit to NDA
Village Pride Shines in Moscow: Dr. Abhishek Borude Completes MBBS in Russia
Centuries-Old Heritage Under Threat; Preservation Plea for Ardhapur’s Historic Artifacts
Marathi News Esakal
www.esakal.com