‘कोरोना’मुळे टरबूज शेतातच पडून

उमाकांत पंचगल्ले
Friday, 24 April 2020

आजपर्यंतच्या काळात अनेक संकटे आली. परंतु, या अनेक संकटांत शेतकरी मात्र होरपळून मरत आहे. कोरोनाच्या महामारीमुळे अनेक जीवित हानी होत आहे, परंतु, शेतकरी वर्गांचे मात्र कंबरडे मोडले आहे. शेतकऱ्यांनी केलेल्या उत्पादन मालाचे कवडीमोल दराने व्यापाऱ्यांकडून मागणी होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. यामुळे मरावे की जगावे, अशी परिस्थिती हणेगाव भागात निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या या नुकसानीला सरकार सुद्धा कोणत्याच प्रकारची पाऊले उचलत नसल्याने शेतकरी वर्गासमोर मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

हणेगाव, (ता.देगलूर, जि. नांदेड) ः कोरोना महामारीमुळे सर्वत्र जीवित हानी झाली असून हाहाकार माजला असताना दुसरीकडे मात्र कोरोनाच्या भीतीमुळे शेतमालाला कवडीमोल दराने मागणी होत आहे. यामुळे हणेगाव विभागातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले असून वझर येथील शेतकरी तेजेराव लवटे यांच्या शेतातील टरबूजला भाव नसल्याने शेतातच पडून आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.

हेही वाचा -  शेती विषयक आस्थापनांसाठी दिलासा....काय ते वाचा

आजपर्यंतच्या काळात अनेक संकटे आली. परंतु, या अनेक संकटांत शेतकरी मात्र होरपळून मरत आहे. कोरोनाच्या महामारीमुळे अनेक जीवित हानी होत आहे, परंतु, शेतकरी वर्गांचे मात्र कंबरडे मोडले आहे. शेतकऱ्यांनी केलेल्या उत्पादन मालाचे कवडीमोल दराने व्यापाऱ्यांकडून मागणी होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. यामुळे मरावे की जगावे, अशी परिस्थिती हणेगाव भागात निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या या नुकसानीला सरकार सुद्धा कोणत्याच प्रकारची पाऊले उचलत नसल्याने शेतकरी वर्गासमोर मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

अनेकांना मोफत वाटप 
देगलूर तालुक्यातील वझर येथील शेतकरी तेजेराव तुळशिराम लवटे यांनी आपल्या दोन एक्कर शेतजमिनीत टरबुजाची लागवड केली होती. जवळपास तीन महिने वेळो वेळी खते-औषधी पाणी दिले व लागवडीसाठी जवळपास एक लाख पंचवीस हजार रुपये आपल्या पदराचे घातले जसे टरबूज हाती आले तसा कोरोनाचा हाहाकार चालू झाला व सर्वत्र लॉकडाउन करण्यात आले. सर्व बाजापेठ बंद झाली व शेतातील तयार माल शेतातच पडला. यामुळे शेतातील भाजीपाला व फळे यांची कवडीमोल दराने व्यापारी मागणी करत आहेत. थेट विक्री करावे तर ऑटोचा खर्च, मजुरांचा हिशोब व माल घेऊन घरापर्यंत गेल्याने लोकांनी सुद्धा एक टरबूज पाच ते दहा रुपयाला देण्याची मागणी करत आहेत. यामुळे कोणत्याही प्रकारे मालाची विक्री केल्यास फायदा काहीच नाही. शेतातच माल सडून जात असल्याने गावातच कवडीमोल भावाने विक्री करत आहोत व अनेकांना मोफत वाटप करत असल्याचे त्यांनी सांगितले.

‘कोरोना’मुळे शेतात तयार झालेला टरबूज बाजारपेठ नसल्याने शेतातच पडून खराब होत आहे व मालाची थेट विक्री करावे तर ग्राहक सुद्धा आडून कमी दराने मागणी करत आहेत. टरबूज लागवड करून चार ते पाच लाख रुपये फायदा होत होता. परंतु, सर्व कोरोनामुळे नुकसान झाले आहे. हणेगाव परिसरात अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. यामुळे शासनाने कोरोनामुळे नुकसान झालेल्या फळे व भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना विमा मंजूर करावे, अशी माझी मागणी सरकारकडे आहे.
- तेजेराव लवटे, शेतकरी वझर.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona causes watermelon to fall in the field, nanded news