esakal | हिंगोली : कोरोनाने बदलली जीवनपद्धती,कवितेतून सादरीकरण
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

सर्वांची जीवनपद्धती बदलली आहे. सामाजिक, धार्मिक कार्यक्रम बंद ठेवावे लागत आहेत  कुटुंबा- कुटुंबात, गावा गावात एकत्रितपणे राहणारे आता अंतर ठेवत आहेत. तसेच आरोग्याच्या बाबतीत काळजी घेत आहेत.

हिंगोली : कोरोनाने बदलली जीवनपद्धती,कवितेतून सादरीकरण

sakal_logo
By
चंद्रमुनी बलखंडे

आखाडा बाळापूर (जि हिंगोली ) :  मागील सहा महिन्यांपासून कोरोनाने अनेक देशात धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे सर्वांची जीवनपद्धती बदलली आहे. सामाजिक, धार्मिक कार्यक्रम बंद ठेवावे लागत आहेत  कुटुंबा- कुटुंबात, गावा गावात एकत्रितपणे राहणारे आता अंतर ठेवत आहेत. तसेच आरोग्याच्या बाबतीत काळजी घेत आहेत. अनेकांच्या हातचा रोजगार गेला तसे मदत करणारे हातही आखडले आहेत. परिणामी व्यवसायाचे स्वरूप ही बदलेले आहे. बदलेल्या जीवनपद्धतीचे वर्णन कवी गणपत माखणे यांनी आपल्या कवितेतून केले आहे. 

कवी गणपत विलास माखणे (रा साळवा ता कळमनुरी) हे आखाडा बाळापूर येथील नारायणराव वाघमारे महाविद्यालयात बीएससी च्या अंतिम वर्षात शिक्षण घेत आहेत. ग्रामीण भागात राहूनही  त्यांनी कवितांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाश टाकला आहे. आतापर्यंत शंभराच्या वर कवितांचें विविध शाळा, महाविद्यालय, कवी संमेलनातून सादरीकरण केले आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठा अंतर्गत विविध महाविद्यालयात कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन केले आहे.  

त्यांनी सादर केलेल्या कवितेतील काही ओळी अश्या आहेत

        आजपर्यत सगळे कसे

        एकत्रीत बसायचे

        घेनन-देन गावचा

        उकीरडा उकरत बसायचे

        नेते  बी सगळे 

        गाव गोळा करायचे

        सरपंचाला वाटायचे

        आपनबी समोर बसायचे

       गर्दीला पाहुन सारे

       आनंदी असायचे

        बोलवल नाही तर 

       रूसुनही बसायचे 

       गळ्यात गळा घालुन 

       भेटी- गाठी करायचे

       जवळ नाही गेलो तर 

        बोलवुन सारे घ्यायचे 

      करोनानी केली जादु 

      गावात येईना कोनताच साधु

      गळ्यात गळा घालणारे बी

       दुर-दुर पळायले 

     गर्दीचे वेडे सारे

     एकांतात बसायले 

     नुसत जरी खोकललो तर

     चोरही दुर पळायले 

      माझ्यात रीक्षात सारे बसा

       म्हणनारा कुठे दिसेना 

      काळी-पिवळी गाडीवाले

       जवळबी येऊ देईनात

        ऐरह्वी कसे काॅलेजमधी

        फ्रेंड एकत्रीत बसायचे

         सारेजन मिळुन सोबतच 

         जेवन करायचे

         कोरोनाने सारेच बदलुन टाकले 

        कधीच हात न धुनारे

        डेटाॅल संपवुन टाकायले 

        कोरोनाच्या नावाणे सारेच घाबरायले

संपादन- प्रल्हाद कांबळे