कोरोनाचा परिणाम : यावर्षी विद्यार्थ्यांना दोन ऐवजी मिळणार एकच गणवेश

राजेश दारव्हेकर
Wednesday, 25 November 2020

दरवर्षी समग्र शिक्षा अभियानांतर्गत इयत्ता पहिली  ते आठवीच्या विद्यार्थ्यांना तसेच सर्व मुली आणि अनुसुचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्यांना दोन शालेय गणवेश वाटप केले जातात . परंतु यंदा कोरोना  संकटामुळे जिल्ह्यात कुठेही शाळा चालु नसून केवळ ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थी शिक्षण घेत आहेत .

हिंगोली : समग्र शिक्षा अभियानांतर्गत शालेय विद्यार्थ्यांना दोन मोफत गणवेश दरवर्षी वाटप केले जातात . परंतु यंदा कोरोना  संकटामुळे सर्वत्र शाळा बंद असल्याने शासनाने मोफत गणवेश वाटपात कपात करुन यंदा विद्यार्थ्यांना एकच गणवेश वाटप केला जाणार आहे.

दरवर्षी समग्र शिक्षा अभियानांतर्गत इयत्ता पहिली  ते आठवीच्या विद्यार्थ्यांना तसेच सर्व मुली आणि अनुसुचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्यांना दोन शालेय गणवेश वाटप केले जातात. परंतु यंदा कोरोना  संकटामुळे जिल्ह्यात कुठेही शाळा चालु नसून केवळ ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या गणवेश वाटपावर चांगलाच परिणाम झाला आहे. गणवेश वाटपाबाबत मध्यंतरी कोणत्याही स्तरावर प्रकारचा निर्णय शासनस्तरावरून घेण्यात नव्हता.

दरम्यान कोरोनाचे संकट विद्यार्थ्यांना काहीसे ओसरत असल्याने शासनाने नववी  ते १२ वी पर्यंतचे वर्ग सुरू करण्याबाबत मान्यता शिक्षण दिली होती. त्यानंतर इयत्ता पहिला ली ते आठवी पर्यंतचे वर्ग देखील सुरू करण्याबाबत निर्णय घेतला होता. मात्र जिल्ह्यात शिक्षकांच्या आरटीपीसीआर चाचण्या सुरू असून त्याचे अहवाल प्राप्त झाले नसल्याने शाळा सुरु झाल्या नाहीत.

ही संभाव्य बाब लक्षात घेता दरवर्षी शालेय अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना दोइ गणवेश वाटप केले जातात. परंतु त्यामध्ये यंदा कपात करुन एकच गणवेश वाटपाचा निर्णय घेण्यात आला. समग्र शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना एकच गणवेश दिला जाणार आहे. राज्यातील विद्यार्थी संख्येनुसार ८६.४८ कोटी रुपयाचा निधी देखील मंजुर करण्यात आला असून प्रत्येक जिल्ह्याला निधी मंजुर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांसाठी एका गणवेशाकरीता शाळा स्तरावर शाळा व्यवस्थापन समितीने गणवेशाचे कापड खरेदी करून गणवेश शिलाई केल्यानंतर विद्यार्थ्यांना वाटप करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. 

याबाबत महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या वतीने जिल्हा परिषदेला पत्र  पाठविण्यात आले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये शालेय विद्यार्थ्यांना एकाच  गणवेशावर समाधान मानावे लागणार आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona effect: This year students will get one uniform instead of two hingoli news