कोरोना :  रुग्ण बरे होण्याच्या दरात हिंगोलीचा दुसरा क्रमांक

राजेश दारव्हेकर
रविवार, 28 जून 2020

आजपर्यत जिल्‍ह्‍यात कोरोना आजाराचे २४८ व्यक्‍तीला लागण झाली असून, त्‍यापैकी २२४ जण बरे झाल्याने त्‍यांना सुट्टी देण्यात आली आहे. आज रोजी ३० कोरोना बाधीत रुग्णांवर उपचार सुरू असून त्‍यांची प्रकृती चांगली आहे.  

हिंगोली : जिल्‍ह्‍यात मेट्रोसिटीतून आजपर्यत ४६ हजार ५९१ नागरीक आले असून त्‍यांची सर्वाची वैद्यकिय अधिकारी, समुदाय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा स्‍वयंसेविका यांच्यामार्फत तपासणी करण्यात आली. कोरोना आजाराचे रुग्ण बरे होण्याच्या रिकव्हरी रेटमध्ये कोल्‍हापूर प्रथम तर हिंगोली जिल्‍हा राज्यातून दुसऱ्या क्रमांकावर असल्याची माहिती आरोग्य विभागातर्फे  देण्यात आली आहे. 

यात कारोना आजाराची चिन्हे, लक्षणे आढळून आल्यास त्‍यांना शासकिय क्‍वारंटाईन करून त्याचे स्‍वॅब नमुने नांदेड येथील वैद्यकिय महाविद्यालयात पाठविण्यात येत होते. तसेच जिल्‍हाधिकारी रुचेश जयवंशी, सीईओ राधाबिनोद शर्मा यांनी कार्यक्षेत्रात प्रत्‍यक्ष भेटी देवून तेथील पाहणी करून कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच सीईओ श्री. शर्मा, जिल्‍हा शल्‍यचिकित्‍सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास, जिल्‍हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांनी कोरोना रुग्ण आढळलेल्या गावात प्रत्‍यक्ष भेटी देवून कंन्टेन्मेंट झोन व बफर झोन येथील भागात सर्वेक्षण करण्याबाबत मार्गदर्शन केले. 

हेही वाचा - धक्कादायक..! आमदाराच्या कुटुंबातील ९ जण पॉझिटिव्ह

आरोग्य विभागातर्फे कोरोना आजाराबाबत कोरोना एक्‍सप्रेसद्वारे जिल्‍ह्‍यातील जास्‍तीत जास्‍त गावात जाऊन जनजागृती करण्यात आली. आजपर्यत जिल्‍ह्‍यात कोरोना आजाराचे २४८ व्यक्‍तीला लागण झाली असून, त्‍यापैकी २२४ जण बरे झाल्याने त्‍यांना सुट्टी देण्यात आली आहे. आज रोजी ३० कोरोना बाधीत रुग्णांवर उपचार सुरू असून त्‍यांची प्रकृती चांगली आहे.  

जिल्‍हात १००८ अंगणवाडी सेविका, ३७ गटप्रवर्तक, १२१४ अंगणवाडी कार्यकर्त्या, ५०३ आरोग्य कर्मचारी, ११९ समुदाय आरोग्य अधिकारी या सर्वाच्या कठोर परिश्रमामुळे जिल्‍हा कोरोना विषाणू आजाराच्या रिकव्हरी रेटमध्ये गुरूवार (ता.२६ जून) आरोग्य सेवा संचनालय पुणे कार्यालयाने जाहीर केलेल्या यादीत कोल्‍हापूर प्रथम तर हिंगोली राज्यातून दुसऱ्या  क्रमांकावर आला आहे. 

हे देखील वाचाच ः सोयाबीन न उगवल्याने शेतकऱ्याने संपवली जीवन यात्रा 
 

असा आहे राज्यातील कोरोना रिकव्हरी रेट (जिल्हानिहाय)
कोल्‍हापूर रिकव्हरी रेट (९०४४), हिंगोली (८७.५५), गोंदिया (८३.५०), परभणी (८२.४२), गडचिरोली (७८.३३), अहमदनगर (७८.१५), सिंधूदुर्ग (७७.३७), सातारा (७५.५३), नांदेड (७४.०१), चंद्रपुर (७३.८५), उस्‍मानाबाद (७३.६८), वर्धा (७३.३३), बुलढाणा (७२.३८), रत्‍नागीरी (७०.७०), बीड (६८.६३), जालना (६८.६१), लातूर (६८.४६), अमरावती (६८.३१), नागपूर (६८.०५), भंडारा (६४.५६), यवतमाळ (६२.०१), वाशीम (६१.६३), अकोला (६१.१७), सांगली (६०.६३), धुळे (६०.४९), रायगड (५९.००), नंदूरबार (५७.७८), मुंबई (५५.२३), सोलापूर (५४.१४), नाशीक (५४.१२), पुणे (५३.८८), जळगाव (५१.३२), औरंगाबाद (५०.२०), ठाणे (४२.१३), पालघर (२७.८७)  

येथे क्लिक कराच - कोरोना नियंत्रणासाठी पोलिसांचे योगदान- अशोक चव्हाण
 

कर्मचाऱ्यांचे अथक परिश्रम 
दरम्‍यान, हिंगोली जिल्‍हा तिसऱ्या क्रमांकावरून दुसऱ्या स्‍थानावर गेल्याने जिल्‍हाधिकारी श्री. जयवंशी, सीईओ शर्मा यांनी जिल्‍ह्‍यातील सर्व वैद्यकिय अधिक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकिय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा स्‍वयंसेविका अंगणवाडी कार्यकर्ती या सर्व अधिकारी या सर्वाचे अभिनंदन केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona: Hingoli Ranks Second In Patient Recovery Rate Hingoli News