esakal | परभणी कारागृहात कोरोनाचा शिरकाव, ८४ कैद्यांना लागन
sakal

बोलून बातमी शोधा

corona

जिल्ह्यात कोरोना संसर्ग झपाट्याने पसरू लागला असून त्याचे समुह संसर्गात रुपांतर होऊ लागले आहे. शनिवार (ता.२२) पर्यंत कोरोना रुग्ण संख्येने दोन हजाराचा टप्पा गाठला असून ९४ जणांचा त्यामध्ये मृत्यू झाला आहे. आता तर कारागृहातील कैद्यांनादेखील कोरोनाची लागण झाली आहे.  

परभणी कारागृहात कोरोनाचा शिरकाव, ८४ कैद्यांना लागन

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी ः जिल्हा कारागृहात समुह संसर्गाने खळबळ उडाली आहे. गत दोन दिवसात ८४ कैदीबांधवांना कोरोनाची लागन झाल्याचे रॅपिड ॲन्टीजन टेस्टमध्ये आढळून आले असून त्यापैकी हायरिस्क १६ जणांना चोख बंदोबस्तात जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत.

जिल्ह्यात कोरोना संसर्ग झपाट्याने पसरू लागला असून त्याचे समुह संसर्गात रुपांतर होऊ लागले आहे. शनिवार (ता.२२) पर्यंत कोरोना रुग्ण संख्येने दोन हजाराचा टप्पा गाठला असून ९४ जणांचा त्यामध्ये मृत्यू झाला आहे. देशासह राज्यातील मृत्यूच्या टक्केवारीपेक्षा ही टक्केवारी अधिक असून त्यामुळे प्रशासनामध्ये देखील चिंतेचे वातावरण आहे. त्यातच दररोज आरटीपीसीआर व रॅपीड टेस्टमधून ६० ते १२० दरम्यान संख्या वाढतच आहे. शहरात देखील कोरोना रुग्ण संख्येने एक हजाराचा टप्पा गाठला असून त्याचा प्रशासकीय यंत्रणेवर प्रचंड ताण आला आहे. रुग्णसंख्येच्या वाढीबरोबरच डेडीकेटेड कोवीड सेंटर्सची संख्या देखील वाढवल्या जात आहे. शहरातील खासगी हॉटेल्स, रुग्णालयांचे रुपांतर देखील डिसीसीमध्ये केले जात आहे.

हेही वाचा - Video ; नवसाला पावणाऱ्या श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपती मंदिरात प्राणप्रतिष्ठापना

दोन दिवसात ४४७ जणांच्या चाचण्या 
जिल्हा कारागृहात एक कर्मचारी व एका कैद्यामध्ये कोरोना सदृश लक्षणे आढळून आल्यानंतर तेथील सर्व कर्मचारी, कैदी यांच्या रॅपीड ॲन्टीजन टेस्ट करण्याचा निर्णय कारागृह अधिक्षकांनी घेतला होता. महापालिकेचे आयुक्त देविदास पवार यांनी शुक्रवार (ता.२१) पासून जिल्हा कारागृहात जाऊन कर्मचारी, कैद्यांच्या रॅपिड टेस्ट करण्याच्या सूचना आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना सावंत यांना दिल्या होत्या. शुक्रवार व शनिवार (ता.२२) या दोन दिवसात ४४७ जणांच्या चाचण्या घेण्यात आल्या. त्यापैकी ८४ जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना सावंत यांनी दिली. 

हेही वाचा - ना ढोल... ना ताशा.... तरीही आनंदात आला गणपती राजा...

प्रशासकीय, आरोग्य यंत्रणा संतर्कतेने कामाला लागली 
शनिवारी रात्री उपविभागीय आयुक्त, आयुक्त, तहसिलदार, आरोग्य अधिकारी यांनी जिल्हा कारागृहात जाऊन विलगीकरण केलेल्या सर्व कैद्यांची तपासणी केली. तेव्हा त्यापैकी रक्तदाब, मधुमेह असे आजार असलेल्या १६ जणांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला व तत्काळ त्यांना पालिकेच्या रुग्णवाहिकेतून रवानगी देखील करण्यात आल्याचे व उर्वरीत रुग्णांना कारागृहातच विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून जिल्हा रुग्णालयाचे पथक त्यांच्यावर तेथेच उपचार करणार असल्याची माहिती डॉ. सावंत यांनी दिली. पॉझिटिव्ह आढळून आलेल्या बहुतांश जणांमध्ये लक्षणे नसल्याची माहिती सुत्रांनी दिली. परंतू, एकाच वेळी एकाच ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येण्याची ही जिल्ह्यातील नव्हे तर मराठवाड्यातील एकमेव घटना असून येथे समुहाने संसर्ग पसरला आहे. संपूर्ण प्रशासकीय, आरोग्य यंत्रणा संतर्कतेने कामाला लागलेल्या असून अनेक खबरदारीच्या उपाययोजना राबवल्या जात आहेत.

संपादन ः राजन मंगरुळकर
 

loading image