‘स्वारातीम’ विद्यापीठात लवकरच ‘कोरोना प्रयोगशाळा’

IMG-20200407-WA0029.jpg
IMG-20200407-WA0029.jpg

नवीन नांदेड ः स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील इंक्य्युबेशन केंद्रामध्ये ‘कोरोना संसर्ग तपासणी प्रयोगशाळा’ तयार झाली आहे. येणाऱ्या दोन दिवसामध्ये आवश्यक त्या मान्यता केंद्र सरकारच्या राष्ट्रीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून (आयसीएमआर) प्राप्त होणार आहेत. त्यानंतर कोरोना संसर्गजन्य द्रवाचे नमुने तपासणी सुरु करण्यात येणार आहे. या प्रयोगशाळेमध्ये एकाचवेळी दोन तासात ३८४ नमुने तपासण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. या मुळे महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची प्रयोगशाळा निर्मिती करणारे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ हे पहिले ठरणार असल्याची माहिती विद्यापीठाच्या वतीने देण्यात आली आहे.


पुढील दोन दिवसात या बाबतची मान्यता मिळणार
राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.उद्धव भोसले आणि जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर यांच्या समन्वयाने ‘कोरोना संसर्ग तपासणी प्रयोगशाळा’ निर्माण होत आहे. विद्यापीठाच्या इंक्य्युबेशन केंद्रामध्ये अत्याधुनिक उपकरणे असलेली सुसज्य प्रयोगशाळा असल्यामुळे ‘कोरोना संसर्ग तपासणी प्रयोगशाळा’ सुरु करण्याकरिता केंद्र सरकारच्या मान्यतेसाठीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडे (आयसीएमआर) सादर केला होता. पुढील दोन दिवसात या बाबतची मान्यता मिळणार आहे.

विद्यापीठाच्या इंक्य्युबेशन केंद्रासाठी यापूर्वीच रुसा कडून रुपये ५ कोटी एवढा निधी मिळाला होता. त्यामुळे अत्याधुनिक अशा उपकरणाची उपलब्धता आहे. उपकरणे व सुविधा निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने रुपये ५२ लक्ष मंजूर केले आहेत. प्रयोगशाळेसाठी लागणारे अत्याधुनिक उपकरणा रियल टाईम पीसीआर उपलब्ध आहे. त्याद्वारे एकाचवेळी दोन तासात ३८४ कोरोना संसर्गाचे स्वॅबचे नमुने तपासता येतात. प्रयोगशाळेतील नमुने परीक्षणाचे काम इंक्य्युबेशन केंद्राचे समन्वयक डॉ.जी.बी.झोरे यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे.


सर्व सहकाऱ्यांचे परिश्रम 
या प्रयोगशाळेच्या उभारणीसाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.उद्धव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली नवोपक्रम, नवसंशोधन आणि साहचर्य मंडळाचे संचालक डॉ.राजाराम माने, रुसा हर्बोमेडिसिन सेंटरचे समन्वयक डॉ.शैलेश वाढेर, कुलसचिव डॉ.सर्जेराव शिंदे, डॉ.जी.बी.झोरे हे विशेष परिश्रम घेत आहेत. डॉ.मनमोहन बजाज,संदीप काळे यांचे विशेष मार्गदर्शन व सहकार्य या प्रयोगशाळेच्या उभारणीसाठी लाभत आहे. कार्यकारी अभियंता अरुण पाटील, उपअभियंता तानाजी हुस्सेकर, अरुण धाकडे यांच्यासह त्यांचे सर्व सहकारी प्रयोगशाळेच्या उभारणीसाठी परिश्रम घेत आहेत.

‘स्वॅब’ तपासणी लवकरात लवकरयासाठी लागणारे कुशल व अनुभवी मनुष्यबळ इंक्य्युबेशन केंद्रामध्ये काम करीत असलेल्या ‘स्टार्ट अप’मधील व्यक्तींची निवड केल्या जाणार आहे. शिवाय बाहेरील प्रशिक्षित मनुष्यबळाची नेमणूक करण्यात येणार आहे. सुरक्षितेच्या दृष्टीकोनातून या प्रयोगशाळेचा १०० मी अंतरापर्यंत कुणीही येणार नाही यासाठीची पूर्ण उपाययोजना करण्यात येणार आहे. इथे फक्त पूर्ण सुरक्षित कपड्यामध्ये प्रशिक्षित कर्मचार्यांनाच प्रवेश दिल्या जाणार आहे. या प्रयोगशाळेमुळे मराठवाडयातील आणि आजूबाजूच्या राज्यातील जिल्ह्यांना मोठा फायदा होणार आहे. कोरोना संशयितांच्या घशातील द्रवाची (स्वॅब) तपासणी लवकरात लवकर होईल. आणि कोरोणाचा संसर्ग झालेल्या रुग्णांवर तत्काळ औषोधोपचार करता येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com