उमरगा शहर, तालुक्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण होतोय कमी

20coronavirus_105_0
20coronavirus_105_0
Updated on

उमरगा (जि.उस्मानाबाद) : उमरगा शहर व तालुक्यात कोरोनाचा संसर्ग तीन महिन्यांत झपाट्याने वाढत गेला. मृत्यूची संख्या ५१ वर पोचली. गेल्या दहा दिवसांत पॉझिटिव्ह रुग्णांचा प्रमाण कमी झाल्याचे चित्र आकडेवारीवरून दिसत आहे. आरोग्य, महसूल, पोलिस आणि पंचायत समितीअंतर्गत येणारी यंत्रणा यांच्यात असलेल्या समन्वयामुळे कोरोनाच्या लढाईत चांगले काम सुरु आहे. दोन दिवसांपूर्वी दौऱ्यावर आलेल्या जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी "उमरगा टीम" चे बैठकीत कौतुक केले होते.


दरम्यान शाबासकीची थाप मिळाल्याने प्रशासनाकडून कामात ढिलाई व्हायला नको. बाजारपेठ खुली झाल्याने होणारी गर्दी आणि त्यातून होणारा संसर्ग ही चिंता अजूनही असल्याने प्रशासनाचा बडगा असायलाच हवा. राज्यात कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वप्रथम उमरग्यात कोरोनाचा पहिला रूग्ण आढळला होता. महिनाभरात पंधरा रुग्ण होते. त्यानंतर तालुका कोरोनामुक्त झाला, परंतु पुणे, मुंबईहुन परतलेल्या लोकांच्या गर्दीने संसर्ग सुरू झाला. २७ जूनपासून सुरू झालेला संसर्ग तब्बल तीन महिन्यांपर्यंत वाढतच राहिला. या काळात एक हजार ८६७ रुग्ण संख्या झाली. त्यात ग्रामीणमध्ये एक हजार चौदा, तर शहरात ८४९ रुग्ण आढळून आले. मृत्यूची संख्या ५१ वर पोचली.

उत्तर प्रदेशातील अत्याचाराच्या घटनेवर भाजपच्या महिला खासदार गप्पा का?,...

पॉझिटिव्ह रुग्णांचा प्रमाण होतोय कमी !
तीन महिन्यात वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे प्रशासनाने योग्य त्या वेळी उपाययोजना केल्याने शेवटच्या टप्प्यात काही प्रमाणात संसर्ग रोखण्यात यश मिळते आहे. मध्यंतरी रुग्ण वाढण्याचा दुहेरी दर चिंताजनक होता. आता तो ६३ टक्क्यांवर आला आहे. पॉझिटिव्हचा दर ११.२९ टक्क्यावर आहे. मृत्यू दर २.५ टक्के आहे. दरम्यान " माझे कुटुंब माझी जबाबदारी" या अभियनाअंतर्गत ग्रामीण भागात आरोग्य कर्मचारी, आशा कार्यकर्त्या व ग्रामपंचायतींच्या स्वयंसेवकांच्या १३३ पथकाने ३९ हजार ५२० कुटुंबांपैकी ३८ हजार ९४२ कुटुंबांचा सर्वे पूर्ण करून एक लाख ९४ हजार ३३३ पैकी एक लाख ८८ हजार १६७ लोकांची तपासणी केली. त्यात दुर्धर आजाराच्या लोकांची संख्या तुलनेने कमी असली तरी लक्षणे असलेल्या लोकांची कोरोना चाचणी घेण्यात येत आहे. जवळपास शंभर पैकी ५२ लोकांच्या चाचणीत पाच जण पॉझिटिव्ह आले आहेत. उमरग्यात पालिकेच्या पथकाने ४६ हजार लोकांपैकी तेरा हजार लोकांची तपासणी केली आहे.


प्रशासनाबरोबरच नागरिकांचीही सतर्कता महत्त्वाची
उमरगा कोविड रूग्णालयात डॉक्टरांचे काम चांगले सुरु असले तरी अधून-मधून अंतर्गत धूसफूस सुरु असते. वैद्यकीय अधीक्षक डॉ.अशोक बडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुहास साळुंके यांचे नियोजन महत्त्वाचे ठरत असून उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, तहसीलदार संजय पवार, गटविकास अधिकारी कुलदीप कांबळे, पोलिस निरीक्षक गजानन घाडगे, मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर, हेमंत किरोळकर आदींची टीम कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. प्रत्येक नागरिकांनीही सतर्कता बाळगणे गरजेचे झाले आहे. तरच येणाऱ्या काळात तालुक्याची वाटचाल कोरोनामुक्तीच्या दिशेने जाऊ शकते.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com