Beed Corona Update: मृत्यू नाही पण रुग्णसंख्या पुन्हा सव्वाशेच्या घरात

आष्टीची रुग्णसंख्या तर वाढती आहेच. शिवाय बीड तालुक्याची शुक्रवारची संख्या आष्टीहून अधिक आढळली
beed corona update
beed corona updatebeed corona update
Updated on
Summary

आष्टीची रुग्णसंख्या तर वाढती आहेच. शिवाय बीड तालुक्याची शुक्रवारची संख्या आष्टीहून अधिक आढळली

बीड: Beed covid-19 update: कोरोना विषाणू संसर्गाची थांबत नसलेली लाट, पॉझिटिव्हिटी रेट आणि मृत्यूसत्र जिल्ह्यासाठी चिंतेची बाब होऊन बसल्या आहेत. शुक्रवारी (ता. २७) नवीन कोरोनाबळीची नोंद नसली तरी पुन्हा एकदा रुग्णसंख्येने सव्वाशेचा पल्ला गाठला. तपासणीच्या तुलनेत रुग्ण आढळण्याचे प्रमाणही २.३३ टक्क्यांवर पोचले. आष्टीची रुग्णसंख्या तर वाढती आहेच. शिवाय बीड तालुक्याची शुक्रवारची संख्या आष्टीहून अधिक आढळली. गुरुवारी (ता. २६) तपासणीसाठी घेतलेल्या ५ हजार १८४ लोकांच्या स्वॅब नमुन्यांच्या तपासणीचे अहवाल शुक्रवारी हाती आले. यामध्ये १२१ नवीन रुग्ण आढळले. तर, ५०६३ लोकांचे स्वॅब नमुने निगेटिव्ह आले.

आष्टीत २९ तर बीड तालुक्यात ३७ रुग्ण आढळले. तर, अंबाजोगाई तीन, धारुर ११, गेवराई १०, केज १३, माजलगाव एक, पाटोदा नऊ, शिरुर दोन आणि वडवणी तालुक्यात सहा रुग्ण आढळले. शुक्रवारी उपचारानंतर बरे झालेल्या ९७ रुग्णांना सुटी देण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ८८१ रुग्णांची नोंद झाली आहे. तर, ९७ हजार १०१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या १०७८ रुग्ण जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर उपचार घेत आहेत. दरम्यान, शुक्रवारी नवीन कोरोनाबळीची नोंद नाही. आतापर्यंत २७०२ जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Deputy Collector Eknath Bangale inspected seized illegal sand stock and reviewed security, distribution, and e-auction plans in Gangapur taluka
The Education Department appointed two teachers at Sayyadpur ZP School after villagers protested against the shortage of teaching staff.
Progressive farmer Govardhan Ugle received the Maharashtra Krushibhushan Award for outstanding achievements in organic farming.
Food Safety Department inspection alerts triggered shop closures amid concerns over gutkha sales and loose edible oil distribution.
Marathi News Esakal
www.esakal.com