esakal | Corona Updates: कोरोनाबळींची संख्या वाढतीच; मराठवाड्यामध्ये आणखी ९१ जणांच्या मृत्यूची नोंद
sakal

बोलून बातमी शोधा

corona

मराठवाड्यात कोरोनामुळे ९१ जणांच्या मृत्यूची बुधवारी (ता.सात) नोंद झाली​

Corona Updates: कोरोनाबळींची संख्या वाढतीच; मराठवाड्यामध्ये आणखी ९१ जणांच्या मृत्यूची नोंद

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद: मराठवाड्यात कोरोनामुळे ९१ जणांच्या मृत्यूची बुधवारी (ता.सात) नोंद झाली. त्यात औरंगाबादेत २९, नांदेड २६, परभणी १२, बीड १०, जालना ६, उस्मानाबाद पाच, लातूर दोन तर हिंगोलीतील एकाचा समावेश आहे. 

घाटी रुग्णालयात वाळूज येथील पुरुष (वय २८), रायगडनगर, सिडको येथील पुरुष (६५), राधास्वामी कॉलनी येथील पुरुष (५९), बुद्धनगर येथील पुरुष (८०), कन्नड येथील महिला (५७), अजीज कॉलनी, नारेगाव येथील महिला (४०), सिल्लोड येथील महिला (७०), बीड बायपास, औरंगाबाद येथील महिला (७४), नारेगाव-चिकलठाणा परिसरातील पुरुष (७०), वैजापूर येथील पुरुष (६८), उस्मानपुरा येथील महिला (७०), एसटी कॉलनी, फाजलपुरा येथील पुरुष (२५), भावसिंगपुरा येथील पुरुष (७०), वैजापूर येथील पुरुष (४५), रायगडनगर येथील पुरुष (७८), रांजणगाव ता. गंगापूर येथील पुरुष (४५), कन्नड येथील पुरुषाचा (३५) मृत्यू झाला. जिल्हा सामान्य रुग्णालयात दोन रुग्णांचा मृत्यू झाला. यात सिडको एन- दोन येथील पुरुष (७२), हर्षी (ता. पैठण) येथील पुरुषाचा (७०) समावेश आहे. 

दारुसाठी लावली वाईन शाॅपला आग, अग्निशमन दल व पोलिस धावल्याने मोठी दुर्घटना टळली

खासगी रुग्णालयात दहा रुग्णांचा मृत्यू झाला. यात असेफिया कॉलनी, औरंगाबाद येथील महिला (२९), सातारा परिसर, बीड बायपास, औरंगाबाद येथील पुरुष (६८), उस्मानपुरा येथील पुरुष (४१), सिडको एन-चार, पारिजात नगर येथील पुरुष (५३), समर्थनगर, औरंगाबाद येथील पुरुष (६८), हमालवाडी, औरंगाबाद येथील महिला (७०), औरंगाबाद शहरातील पुरुष (६५), सिडको एन-१ येथील पुरुष (७७), शंकरपूर (ता. गंगापूर) येथील महिला (६४), गेवराई कुबेर (ता. जि. औरंगाबाद) येथील पुरुषाचा (५९) समावेश आहे. 

कोरोना मीटर (औरंगाबाद)- 
आतापर्यंतचे बाधित ९२६७३ 
बरे झालेले ७५९०३ 
उपचार घेणारे १४८९७ 
एकूण मृत्यू १८७३ 

धक्कादायक प्रकार! मिनी घाटीतून ९० वर्षीय  कोरोनाबाधित रुग्ण पळाला

नव्या ६ हजार १७२ रुग्णांची भर-
मराठवाड्यात दिवसभरात ६ हजार १७२ कोरोनाबाधितांची भर पडली. जिल्हानिहाय वाढलेले रुग्ण असे - औरंगाबाद १४०७, नांदेड १२५५, लातूर ९६९, परभणी ६८४, जालना ६१४, बीड ५८०, उस्मानाबाद ४६८, हिंगोली १९५. औरंगाबाद जिल्ह्यातील रुग्णांची संख्या ९२ हजार ६७३ वर पोचली आहे. सध्या १४ हजार ८९७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. बरे झालेल्या आणखी १ हजार ५९८ जणांना सुटी देण्यात आली. त्यात महापालिका क्षेत्रातील बाराशे तर ग्रामीण भागातील ३९८ जणांचा समावेश आहे. आजपर्यंत ७५ हजार ९०३ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार ८७३ जणांचा मृत्यू झाला आहे. 
 

loading image