
Covid 19: मराठवाड्यातील प्रसार होतोय कमी; नवीन रुग्ण सातशेच्या आत
औरंगाबाद: मराठवाड्यात बुधवारी (ता.नऊ) दिवसभरात ६७९ जणांना कोरोनाची लागण झाली (marathwada corona updates). जिल्हानिहाय आढळलेले रुग्णांमध्ये बीड १४६, औरंगाबाद १४४, नांदेड १३८, उस्मानाबाद ११९, लातूर ६७, जालना ३२, परभणी ३०, हिंगोलीतील ३ रुग्णांचा समावेश आहे. उपचारादरम्यान आणखी ३६ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात लातूरमध्ये १२, औरंगाबाद ८, बीड ७, जालना ४, हिंगोली-उस्मानाबादेत प्रत्येकी दोन, नांदेडमधील एकाचा समावेश आहे.
औरंगाबादेत १४४ बाधित-
औरंगाबाद जिल्ह्यात १४४ जण कोरोनाबाधित आढळले. त्यात शहरातील ३७, ग्रामीण भागातील १०७ जण आहेत. रुग्णांची संख्या १ लाख ४४ हजार २३५ झाली. बरे झालेल्या आणखी २०४ जणांना सुटी देण्यात आली. यात शहरातील १४३, ग्रामीण भागातील ६१ जणांचा समावेश आहे. आजपर्यंत १ लाख ३८ हजार ८४२ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या २ हजार ९२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
घाटी रुग्णालयात पाच तर खासगी रुग्णालयात तिघांचा मृत्यू झाला. पैठण येथील महिला (वय ७८), पटेगाव येथील महिला (७०), पिशोर (ता. कन्नड) येथील महिला (८८), रांजणगाव वाळूज येथील महिला (७५), देवगाव (ता. कन्नड) येथील महिलेचा (८२) घाटीत तर सिडकोतील पुरुष (५०), अरिहंतनगरातील पुरुष (६४), हस्ता (ता. कन्नड) येथील पुरुषाचा (४७) खासगी रुगणालयात मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत ३ हजार३०१ जणांचा मृत्यू झाला आहे.