esakal | हिंगोलीत कोरोनाचा दिवाळीपूर्वी उतरलेला आलेख वाढतोय, प्रशासनाकडून उपाययोजना
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

राज्यात पुन्हा कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याचे संकेत मिळत असल्याने नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हिंगोलीत कोरोनाचा दिवाळीपूर्वी उतरलेला आलेख वाढतोय, प्रशासनाकडून उपाययोजना

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली :  जिल्ह्यात दिवाळीपुर्वी कोरोनाचा आलेख उतरलेला असताना दिवाळीनंतर टप्याटप्याने रुग्ण संख्या वाढतच चालली आहे. त्यामुळे भविष्यात कोरोनाचा संसर्ग अधिक वाढू नये या दृष्टीने प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे.

राज्यात पुन्हा कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याचे संकेत मिळत असल्याने नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.मार्च महिन्यांपासून राज्यभरात कोरोना विषाणुचा संसर्ग वाढल्यामुळे शासन व प्रशासनाने लॉकडाऊन घोषीत केला होता.यानिमित्त प्रत्येक दिवशी कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्याने त्यांना शासकिय रुग्णालयासह इतर ठिकाणाच्या क्वॉरटाईन सेटरमध्ये ठेवले जात होते . जवळपास ३ हजार ३५३ कोरोना बाधीत जिल्ह्यामध्ये आढळून आले आहेत .त्यातील बहुताशी कोरोना बाधीतांनी मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आले . 

हेही वाचा - नांदेड जिल्ह्यात पांढरे सोने मातीमोल, मजुराला मात्र आला मोठा भाव -

जवळपास ५२ कोरोना बाधीताचा मृत्यू झाला आहे. इतर जिल्ह्याच्या तुलनेत हिंगोली जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण कमी आढळून आले असून मृत्यूचा दरही तसा कमीच आहे . जिल्हाधिकारी रुपेश जयवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, प्रशात खेडेकर, प्रविण फुलारी , जिल्हा आरोग्य अधिकारी शिवाजी पवार, जिल्हा शल्य चिकित्सक राजेंद्र सर्यवंशी आदी सह प्रशासनातील अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोरोनावर मात करण्याकरीता दिवसरात्र प्रयत्न चालु ठेवले आहेत.सध्या स्थितीत कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत.आज घडीला ३१ कोरोना पाँझीटीव्ह आहेत. तर जिल्ह्यात एकुण बाधीतांची संख्या तीन हजार ३५३ आहे. तर बरे झालेल्यात तीन हजार २१० रुग्ण आहेत. उपचार सुरू असलेले ९१ रुग्ण आहेत तर आतापर्यंत जिल्ह्यात ५२ रुग्णांचा मृत्यू  झाला आहे.

कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे नागरिकात देखिल भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाकडून सुध्दा काटेकोर योग्य त्या उपाययोजना आखल्या असताना नागरिकांनी देखिल खबरदारी घेण्याची नितांत गरज मानली जात आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image