VIDEO : बेड्या घालून येतो नगरसेवक औरंगाबाद महापालिकेत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 ऑक्टोबर 2019

औरंगाबाद : आलिशान गाड्यांमधून, अंगावर किलोभर सोन्याचे दागिने घालून महापालिकेत येणारे नगरसेवक, नेते, पुढारी राज्यभर सर्वच शहरांतून दिसतात. पण हातकड्या घालून येणारा नगरसेवक फक्त औरंगाबादेत आहे. त्याचे नाव आहे सय्यद मतीन.

औरंगाबाद : आलिशान गाड्यांमधून, अंगावर किलोभर सोन्याचे दागिने घालून महापालिकेत येणारे नगरसेवक, नेते, पुढारी राज्यभर सर्वच शहरांतून दिसतात. पण हातकड्या घालून येणारा नगरसेवक फक्त औरंगाबादेत आहे. त्याचे नाव आहे सय्यद मतीन.

मजलिस-ए-इतितेहादुल मुसलमीन, म्हणजेच एमआयएम या पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेला वादग्रस्त नगरसेवक सय्यद मतीन सध्या हर्सूल कारागृहात आहे. शनिवारी (ता. 5) सर्वसाधारण सभा असल्यामुळे तो न्यायालयाची परवानगी घेऊन हर्सूल कारागृहातून हातकड्यांसह महापालिकेत हजर झाला.

महापालिका मुख्यालयावर उर्दू फलक लावणे, महापौरांवर खुर्च्या भिरकावणे, दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली सभेत वादग्रस्त वक्तव्य, अशा प्रकरणांमुळे मतीन याची एमआयएम पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर त्याचे एका नगरसेविकेसोबतचे प्रेमप्रकरणही सोशल मिडीयाद्वारे चव्हाट्यावर आले. एका महिलेने केलेल्या बलात्काराच्या तक्रारीनंतर पोलिसांनी बेड्या ठोकत त्याची हर्सूल कारागृहात रवानगी केली आहे.

सध्या महापालिकेची सर्वसाधारण सभा असेल, तेव्हा तो हातकड्यांसह हजर होतो. सभा संपली की त्याला परत तुरुंगात नेले जाते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corporator comes with Handcuffs in Aurangabad Municipal corporation