
बीड : जिल्ह्यात खरीप हंगामात सोयाबीन पिकानंतर कापसाचा पेरा सर्वाधिक झालेला आहे. परंतु, कापूस पणन महासंघाकडून अद्याप एकही खरेदी केंद्र सुरू करण्यात आले नसल्याने अनेक नैसर्गिक अडथळ्यांचा सामना करत हाती आलेल्या कापसाला कमी दराने विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.