esakal | भाकरीचा चंद्र शोधाणाऱ्या कुटुंबाचे समुपदेशन, कुठे? ते वाचाच
sakal

बोलून बातमी शोधा

photo

पावसाळा संपला की, हिवाळ्याची चाहूल लागताच लोकवस्तीच्या आश्रयाला गाव कुसात पाल ठोकून अनेक परप्रांतीय कुटुंब स्थिरावल्याचे दिसून येतात. शाळेची वाट चुकलेल्या अर्धापुर येथील भटकंती करणाऱ्या कुटुंबातील शाळाबह्य मुलांच्या पालकांचे समुपदेशनाद्वारे शिक्षण हक्काची एका महिला बालरक्षकाने जानीव करुन दिली.

भाकरीचा चंद्र शोधाणाऱ्या कुटुंबाचे समुपदेशन, कुठे? ते वाचाच

sakal_logo
By
नवनाथ येवले

नांदेड : पोटाची खळगी भरण्यासाठी दाही दिशा भटकंती करणारी कुटुंबे आजही दारिद्रयाच्या झळा सोसत जीवन कंठीत असल्याचे विदारक चित्र आहे. पावसाळा संपला की, हिवाळ्याची चाहूल लागताच लोकवस्तीच्या आश्रयाला गाव कुसात पाल ठोकून अनेक परप्रांतीय कुटुंब स्थिरावल्याचे दिसून येतात. शाळेची वाट चुकलेल्या अर्धापुर येथील भटकंती करणाऱ्या कुटुंबातील शाळाबह्य मुलांच्या पालकांचे समुपदेशनाद्वारे शिक्षण हक्काची एका महिला बालरक्षकाने जानीव करुन दिली.
 
शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनस्तरावरुन अनेक उपाय-योजनांसह उपक्रम राबविण्यात येतात. शिक्षणविभागाच्या वतीने बालरक्षकांच्या माध्यमातून शाळाबाह्य मुलांची नियमीत शोधमोहिम राबविण्यात येत आहे. पार्डी (ता. अर्धापुर) जिल्हा परिषद शाळेत कार्यरत व बालरक्षक म्हणून जबाबदारी पेलणाऱ्या उषा नगीरे यांची नजर प्रवासा दरम्यान अर्धापूर शहरालगत राज्य महामार्गाच्या कडेला एका तंबूकडे स्थिरावली. एक शिक्षीका आणि बालरक्षक अशा दुहेरी कर्तव्य बजावणाऱ्या सौ. नळगीरे यांना गाडीतून डोकावताना काही पालक चिमुकले तंबुसमोर खेळताना दिसले. त्या दिवसापासुन नकळत तंबुकडे वळण्याचा मोह त्यांना आवरला नाही. 


येथे क्लिक कराअशोक चव्हाण म्हणाले, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर येत आहे गदा

मुर्तीच बनल्या उदर्निवाहाचे साधन -
शनिवारी (ता. २९ फेब्रुवारी २०२०) त्यांची पावले तंबुकडे वळली. कोणीतरी अनोळखी व्यक्ती आपल्याकडे येत असल्याचे पाहून खेळ सोडून चिमुकले आपापल्या तंबूत जाऊन दडली. मात्र, चॉकलेट दाखवून सौ. नळगीरे यांनी मुलांना हाक मारली. तशी तंबुत दडलेली सर्व मुले त्यांच्या जवळ आली आणि काही क्षणात बोलती झाली. मुलांच्या व्यथेनुसार उपस्थित पालकांसोबत संवाद साधला असता,  ही कुटुंबे उदयपुर राजस्थान येथील.  मूर्ती बनविने त्यांच्या उदरनिर्वाहाचे मुख्य साधन असल्याचे त्यांनी सांगीतले.  कुटुंबातील व्यक्तींसह महिलाही तयार केलेल्या मूर्ती विक्रीसाठी घेऊन बाहेर पडतात. भल्या सकाळी पोटाची खळगी भरण्यासाठी पालाबाहेर पडणाऱ्या व्यक्तीच्या पाठीमागे पालांची राखन करण्याची जबाबदारी या चिमुकल्यावंर असते. त्यामुळे चिमुकल्यापर्यंत शिक्षण पोहोचले नाही. 

हेही वाचा  - तिला जायचं होतं भावाच्या लग्नाला, पण बसमध्ये... ​
डोळ्याचा कडा पणावल्या-  


सौ. नळगीरे यांनी पालकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. तसे पालकांनी लगेच आपल्या पाल्यांना शिक्षणाची दारे खुले करण्याची समर्थता दर्शविली. दारिद्र्याचे चटके सहन करणाऱ्या कुटुंबाकडे पाहुण्यांचे आदरातिथ्य करण्याचे आर्थिक बळ नसले तरी, विक्रीसाठी तयार केलेल्या मूर्ती मधून छत्रपती शिवरायांची मूर्ती भेट देऊन सौ. नळगीरे यांचा त्यांनी बहुमान केला. आणि नकळत सौ. नळगीरे यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. बालरक्षक सौ. नळगीरे यांच्या कर्तव्यदक्ष सामाजिक जाणिवेतून केलेल्या प्रेरणादायी कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.