परभणीतून नऊ हजार ६०० रुपयांच्या खोट्या नोटा जप्त

गणेश पांडे 
Tuesday, 1 December 2020

या माहितीवरून विशेष पथकाने रात्री दहा वाजेच्या सुमारास वडगाव सुक्रे (ता.परभणी) या गावातील बसस्टँड परिसरातील काही दुकानात 200 रुपयांच्या खोट्या नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न केला जात होता. यातील तिघा आरोपींना ताब्यात घेण्याची धाडसी कारवाई पोलिसांच्या विशेष पथकाने केली.

परभणी : येथील दोनशे रुपयांच्या खोट्या नोटा चलणात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच जणांना विशेष पथकाने सोमवारी (ता.30) रात्री वडगाव सुक्रे (ता.परभणी) गावातून अटक केली. त्यांच्याकडून 9 हजार 600 रुपयांच्या नकली नोटा व इतर साहित्य जप्त करण्यात आले.

सोमवार (ता.३०) नोव्हेंबर रोजी विशेष पथकाला खोट्या नोटा चलनात आणल्या जात असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीवरून विशेष पथकाने रात्री दहा वाजेच्या सुमारास वडगाव सुक्रे (ता.परभणी) या गावातील बसस्टँड परिसरातील काही दुकानात 200 रुपयांच्या खोट्या नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न केला जात होता. यातील तिघा आरोपींना ताब्यात घेण्याची धाडसी कारवाई पोलिसांच्या विशेष पथकाने केली.

नमूद तिन्ही आरोपीकडे २०० रुपयांच्या ४८ नोटा असे तब्बल नऊ हजार ६०० रुपये पोलिसांनी जप्त केले. विशेष पथकाचे फौजदार चंद्रकांत पवार यांनी पोलिसी खाक्या दाखवताच संबंधित घटनेतील तिन्ही आरोपींनी ताब्यात घेऊन या प्रकरणी अधिक चौकशी केली असता नकली नोटा माजलगाव (जि.बीड) येथील दोघांकडून आणल्याचे विशेष पथकासमोर कबूल केले. 

त्यानंतर विशेष पथकाचे पोलिस उपनिरिक्षक चंद्रकांत पवार, फौजदार विश्वास खोले, सहकारी पोलीस कर्मचारी सुग्रीव केंद्रे, यशवंत वाघमारे, राहूल चिंचाने, शंकर गायकवाड़, विष्णु भिसे, दीपक मुदिराज, श्री. धरने या  पथकाने तात्काळ तपासाची सुत्र हलवत घटनेतील दोन आरोपी मध्यरात्रीच्या सुमारास माजलगाव (जि.बीड) अटक केली. या नकली नोटा प्रकरणात सय्यद फ़िरोज, मारोती साळूंके, भागवत शिंदे, नुर मोहम्मद हाशम अतार या चौघांसह एक विधी संघर्ष बालकही आहे. 

पाचही आरोपीकडून ९ हजार ६०० रुपयांच्या २०० रुपयांच्या ४८ नोटांसह २० हजार रुपयांची जुनी मोटारसायकल असा २९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. आरोपींना दैठना पोलिस स्थानकाचे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. दैठना पोलिस ठाण्यात विशेष पथकातील पोलिस कर्मचारी राहूल चिंचाणे यांनी तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून मंगळवारी (ता.०१)  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास दैठना पोलिस ठाण्याचे फौजदार श्री. आदुडे हे करीत आहेत. विशेष पथकाने ताब्यात घेतलेली बनावट नकली नोटा चलणात आणणारी ही टोळी मागील एक ते दीड वर्षापासून परभणी जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात बनावट नकली नोटांचा काळाकारभार चालवत असल्याची शक्यात पोलिसांनी वर्तविली आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Counterfeit notes have been seized in Parbhani