
जिल्ह्यात ४२२ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शुक्रवारी (ता. १५) मतदान झाले सरासरी ८२.२३ टक्के मतदान झाले. ४९५ पैकी ७३ ग्रामपंचायती बिनविरोध आल्याने ४२२ ग्रामपंचायतसाठी ४०४१ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते
हिंगोली : जिल्ह्यात ४९५ ग्रामपंचायत पैकी ७३ बिनविरोध झाल्याने ४२२ ग्रामपंचायतसाठी सरासरी ८२.२३ टक्के मतदान झाले.आता सोमवारी ( ता. १८ ) १०७ टेबलवर सकाळी दहा वाजता तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे प्रशासन सज्ज झाले असुन उमेदवारांची मात्र धाकधूक वाढली आहे.
जिल्ह्यात ४२२ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शुक्रवारी (ता. १५) मतदान झाले सरासरी ८२.२३ टक्के मतदान झाले. ४९५ पैकी ७३ ग्रामपंचायती बिनविरोध आल्याने ४२२ ग्रामपंचायतसाठी ४०४१ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते. ,त्यापैकी ८१४ उमेदवार बिनविरोध आल्याने ३२०० उमेदवार निवडणूक रिंगणात होते. दरम्यान, शुक्रवारी १ हजार २७६ मतदान केंद्रावर मतदान निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. सरासरी ८२.२३ टक्के मतदान झाले जिल्ह्यात पाच लाख ५५ हजार ६५५ पैकी चार लाख ५७ हजार २३९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आता उमेदवारांसह त्यांचे समर्थक व गावकऱ्यांना देखील मतमोजणीची उत्कंठा लागली आहे.
हेही वाचा - हिंगोली : गुंज येथे मतदान केंद्रावर तैनात पोलिस कर्मचाऱ्यास मारहाण, प्रतिष्ठितांसह १२ जणांवर गुन्हा
यासाठी प्रशासनाने मतमोजणीची तयारी केली असून जिल्ह्यात पाच तालुक्याच्या ठिकाणी सकाळी दहा वाजता १०७ टेबलवर मतमोजणी होणार आहे. यासाठी ६७० अधिकारी कर्मचारी मतमोजणीसाठी काम करणार आहेत. हिंगोली तालुक्याची मतमोजणीची कल्याण मंडपात होणार असून यासाठी २५ टेबल लावण्यात आले आहेत यासाठी ३०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
वसमत तालुक्याची मतमोजणी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत केली जाणार आहे. यासाठी १४ टेबलवर १२० कर्मचारी मतमोजणी करणार आहेत. सेनगाव तहसील कार्यालयात वीस टेबलवर १५० कर्मचारी मतमोजणी करणार आहेत. औंढा नागनाथ येथील तहसील कार्यालयात २३ टेबलवर १०० कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तर कळमनुरी येथील तहसील कार्यालयात २५ टेबलवर शंभर कर्मचारी मतमोजणीचे काम करणार आहेत. यासह पोलिस प्रशासन देखील कडक बंदोबस्त ठेवणार आहे.
संपादन - प्रल्हाद कांबळे