देशीला आला विदेशी दारुपेक्षाही जास्तीचा भाव, तलप भागवण्याठी तळीरामाची धावाधाव

Country Liquor, Nilanga
Country Liquor, Nilanga

निलंगा (जि.लातूर) ः राज्य सरकारने संपूर्ण महाराष्ट्रात देशी-विदेशी दारू दुकाने बंद केल्यामुळे तळीरामांचा हिरमोड झाला आहे. त्यामुळे मिळेल ती दारू मिळविण्यासाठी तळीरामांची भटकंती सुरू असून देशीचाही भाव देशी दारूपेक्षाही अधिक झाला आहे. निलंगासह तालुक्यात ५२ रुपयांच्या देशी बाटलीसाठी दोनशे ते अडीचशे रुपये मोजावे लागत आहेत.


कोरोनाचा संसर्ग वाढू नये सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्स) पाळण्यात यावा यासाठी गर्दी होऊ नये म्हणून महाराष्ट्र शासनाने टाळेबंदी केले आहे. यामध्ये सर्व प्रकारचे मद्य असणारे दुकानेही बंद होऊन महिन्यापूर्ण झाला आहे. त्यामुळे अवैधरित्या शहरासह ग्रामीण भागात दारूकडे असलेला साठा संपत आला आहे. आजही चोरून मोठ्या प्रमाणात दारू विक्री होताना दिसत आहे. ग्रामीण भागात राजरोसपणे चालणारे देशी दारूला मोठे महत्त्व आले असून ५२ रुपयाला मिळणारी देशी दारूची बाटली अडीचशे रुपयाला दिली जात आहे.

दारू विक्रेते दारूची दुकाने बंद असतानाही कशाप्रकारे माल मिळत असतील हा विषय चिंतनाचा आहे. सध्या विदेशी दारूची एक क्वॉर्टर पाचशे ते सहाशे रुपये झाली असून अधिक पैसे देऊन दारू मिळत नसल्यामुळे तळीरामांचा हिरमोड होत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून त्यावर कारवाई केली असल्याचे सांगण्यात येत असले तरी दारूचा साठा, बाटली कशी उपलब्ध होत आहे. हा संशोधनाचा विषय आहे. शहरासह ग्रामीण भागातील सर्व बिअर बार उत्पादन शुल्क विभागाकडून बंद केले असले तरी पूर्वीचा असलेला साठा चोरून विक्री होताना दिसत आहे. याबाबत उत्पादन शुल्क विभाग आणि प्रत्येक बिअर बारला यापूर्वीचा शिल्लक साठा किती होता. विक्री किती झाली याबाबतची तपासणी करून दुकाने सील करण्याची गरज आहे.

हातभट्टीचा वीस रूपयाचा तांब्या दीडशे रूपयाला.
तालुक्यातील कासारसिरशी, कासारबालकुंदा, कोराळी, कोराळवाडी, मदनसुरी परिसरात मोठ्या प्रमाणात हातभट्टी दारू काढून विक्री केली जाते. पूर्वी वीस रुपयांला एक तांब्या मिळणारी हातभट्टी टाळेबंदी व सध्या दारू मिळत नसल्याने १५० रुपयाला झाला आहे. सध्या सर्वच दारूचे दुकान बंद असल्याने मदनसुरी येथील हातभट्टीला अच्छे दिन असून २० रुपयाला मिळणारा एक तांब्या १२० ते १५० रुपयाने विक्री चालू आहे. जे नियमित गिऱ्हाईक आहेत त्यांच्यामार्फत विक्री चालू असून अनोळखी व्यक्तीला हातभट्टी दिली जात नाही.ओळखीच्या व्यक्तीला काही निश्‍चित ठिकाणे ठरली असून त्याच ठिकाणी वेळेवर उपलब्ध होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com