esakal | फौजदार ‘रुपाली’ यांचा साहसी प्रवास
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

परभणीच्या पोलिस दलात कार्यरत असणाऱ्या फौजदार रुपाली गौतमराव कांबळे यांनी देखील जीवनात आलेल्या वादळांशी दोन हात करत स्वताला जीवनाच्या कसोटीवर सिध्द केले आहे.

फौजदार ‘रुपाली’ यांचा साहसी प्रवास

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी : प्रारब्धाच्या फेऱ्याने पाठ सोडली नाही तरी, प्रचंड जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर जीवनात आलेल्या प्रत्येक दु:खावर मात करून स्वताला सिध्द करण्याची कला एका स्त्री मध्ये असते. म्हणूनच तिला स्वंयसिध्दा म्हणून संबोधले जाते. परभणीच्या पोलिस दलात कार्यरत असणाऱ्या फौजदार रुपाली गौतमराव कांबळे यांनी देखील जीवनात आलेल्या वादळांशी दोन हात करत स्वताला जीवनाच्या कसोटीवर सिध्द केले आहे. त्यांचा हा साहसी प्रवास इतरांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.

मुळच्या अर्धापूर (जि.नांदेड) येथील रहिवाशी असलेल्या फौजदार रुपाली कांबळे यांच्याकडे पाहिल्यानंतर खरच या स्त्रीच्या जीवनात कधी दु:ख आली असतील का? असा प्रश्न पडतो. कारण कामात प्रचंड तरबेज, तिक्ष्ण आणि तितक्याच मृदू मनाच्या त्या आहेत. परंतू, त्यांच्याशी गप्पा मारल्यानंतर त्यांच्या जीवनात दुखाच्या कितीतरी लाटा आल्या याची कल्पना आली. वडील गौतमराव कांबळे हे जिल्हा परिषदेत कर्मचारी होते. त्यांना रुपाली यांच्यासह आम्रपाली, शीतल व मनिषा या चार मुली. त्यात रुपाली या सर्वात मोठ्या. लहानपनापासूनच खोडकर वृत्तीच्या रुपाली कांबळे यांचा अभ्यासातही तितकाच पुढाकार होता. त्यामुळे सातत्याने प्रत्येक परीक्षेत त्यांची गुणवत्ता वाढतच गेली.
 
हेही वाचा -अवैध वाळू उत्खनन थांबेना!

सुवर्ण पदक विजेत्या
केवळ पुस्तकी अभ्यासच नाही तर वक्तृत्व व वादविवाद स्पर्धेतही त्यांनी राज्यच काय तर राष्ट्रीयस्तरावर देखील अनेकवेळा विजय संपादन केला आहे. त्याच बरोबर हर्डल्स (अडथळ्याची शर्यत) स्पर्धेतही राज्यस्तरावरील सुवर्ण पदक विजेत्या आहेत. राष्ट्रीय स्पर्धेत देखील त्यांनी वाखाण्याजोगी कामगिरी केली. अर्धापूर येथील मीनाक्षी शाळेत पहिली ते १२ पर्यंतचे शिक्षण घेतलेल्या रुपाली कांबळे यांची २००५ मध्ये हिंगोली पोलिस दलात शिपाई पदावर नियुक्ती झाली.

नियतीच्या पहिला वार २००९ मध्ये
पोलिस दलात नौकरीला लागल्यानंतर रुपाली कांबळे यांचे २००९ मध्ये लग्न झाले. परंतू नियतीला त्यांचा सुखी संसार मान्य नव्हता. अवघ्या सहा महिण्याच्या कालावधीतच पतीचे अपघाती निधन झाले आणि त्यांच्यावर दुखाचा डोंगर कोसळला. या धक्यातून रुपाली कांबळे दिर्घकाळ बाहेर आल्याच नाही. याच दिवसात त्यांनी मुलीला जन्म दिला. त्यांची आवस्था पाहून वडीलांची चिंता अधिकच वाढली. परंतू परत आपल्या मुलीला दुखातून बाहेर काढून तिला उभे करण्यासाठी आई - वडीलांनी प्रयत्न सुरु केले.

हेही वाचा - साडेतीन लाखांची सिगारेट जप्त

‘एमपीएससी’च्या पहिल्याच प्रयत्नात टॉपर
दुखातून थोडस सावरल्यानंतर रुपाली कांबळे यांनी परत पोलिस दलात कार्यरत होऊन २०१२ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून यश संपादन केले. पहिल्याच प्रयत्नात त्या नुसत्या यशस्वी झाल्या नाही तर टॉपर ठरल्या. एक वर्ष प्रशिक्षणानंतर वसमत (जि.हिंगोली) येथे त्यांना फौजदार म्हणून नियुक्ती मिळाली. दुखातून बाहेर आल्यानंतर त्या अधिकच कणखर झाल्या. त्या काळात उत्कृष्ट तपास कार्याबद्दल त्यांना विशेष पोलिस महानिरीक्षकांकडून पुरस्कारही मिळाले. २०१८ मध्ये ‘हिरकणी’ पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले. अधिकारी झाल्यानंतर त्यांनी वडीलांचे कार्य पूर्ण केले. छोट्या तीन बहिणींना त्यांच्या पायावर उभे करून दोघींचे लग्न लावून दिले.


संकटावर मात करायला शिका
जीवन अमुल्य आहे. जीवनात काही तरी मिळविणे ही जिद्द मनात धरली तर यश नक्कीच आहे. संकटावर मात करायला शिका. माझ्या जीवनात माझे आई वडील, मावशी उर्मीला अटकोरे व माझी मुलगी समीक्षा यांचे मोठे योगदान आहे.
- रुपाली कांबळे, फौजदार, परभणी पोलिसदल.
 

loading image
go to top