बीड - गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) कोठडीत असलेल्या वाल्मीक कराड याच्या खंडणी प्रकरणातील जामीन अर्जावर गुरुवारी (ता. २३) सुनावणी होणार आहे. कराडच्या वकिलांकडून सुनावणीसाठी मुदत वाढवून मागितली. .मस्साजोग (ता. केज) येथील अवादा कंपनीच्या पवनचक्की प्रकल्पासाठी दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची फिर्याद ११ डिसेंबरला प्रकल्पाचे सुनील शिंदे यांनी केज पोलिस ठाण्यात दिली. त्यावरून वाल्मीक कराड, सुरवातीला कराडला या गुन्ह्यात केज न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट रचल्याच्या तपासासाठी सध्या कराड ‘सीआयडी’ कोठडीत आहे..कराडच्या जामिनासाठी केज न्यायालयात अर्ज केला आहे. त्यावर शनिवारी (ता. १८) होणारी सुनावणी आज ठेवली होती. पण त्याच्या वकिलांनी मुदत वाढवून मागितल्याने न्यायालयाने आता युक्तिवाद येत्या २३ रोजी होणार आहे..चौकशी समितीचे मुख्यालय बीडऐवजी मुंबईमस्साजोग (ता. केज) येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी स्थापन केलेल्या न्यायालयीन समितीचे मुख्यालय आता मुंबईत असणार आहे. समिती अध्यक्ष निवृत्त न्यायाधीश एम. एल. ताहलियानी यांच्या विनंतीवरून शासनाने सोमवारी हा निर्णय घेतला..या प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभाग करत असून खुनाच्या तपासासाठी विशेष पथकही नेमण्यात आले आहे. त्यानंतर गेल्या आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश एम. एल. तहलियानी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. सुरुवातीला या समितीचे मुख्यालय बीडला असेल असे जाहीर झाले होते. न्या. तहलियानी यांच्या विनंतीनुसार आता मुख्यालय मुंबईला असेल, असे शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.