Court Employees Threaten Agitation Work with Black Ribbons Tied in Gangapur
sakal
- रामेश्वर अमृते
गंगापूर - समान काम-समान वेतन यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील दुय्यम न्यायालयांतील कर्मचारी आंदोलनाच्या तयारीत आहेत. शासनाकडून मागण्या मान्य न झाल्यास १७ नोव्हेंबर पासून बेमुदत संप पुकारण्याचा इशारा देण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद जिल्हा न्यायालयीन कर्मचारी गट-क संघटनेच्या वतीने १६ ऑक्टोबर रोजी गंगापूर येथील न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून निषेध नोंदवला आणि कामकाज केले.