
सात वर्षीय मुलाचा खून केल्याची घटना मौजे चिकलठाणा (बु., ता.सेलू) येथे सोमवारी (ता.१२) दुपारी अडीचच्या सुमारास घडली. अभिराज श्रीराम जाधव असे या मुलाचे नाव आहे. खून करणाऱ्या चुलत आजोबाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सेलू : सात वर्षीय मुलाचा खून केल्याची घटना मौजे चिकलठाणा (बु., ता.सेलू) येथे सोमवारी (ता.१२) दुपारी अडीचच्या सुमारास घडली. अभिराज श्रीराम जाधव असे या मुलाचे नाव आहे. खून करणाऱ्या चुलत आजोबाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अभिराज हा घरासमोर खेळत होता. त्यावेळी त्याचे चुलत आजोबा डिगांबर जाधव (वय ५६) यांनी त्याचा गळा दाबला. हा प्रकार निदर्शनास येताच आईने धाव घेत अभिराजची सुटका करण्याचा प्रयत्न केला. परंतु, डिगांबर यांनी अभिराजवर विळ्याने वार केले. गंभीर अवस्थेत त्याला सेलू उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.
हेही वाचा - नांदेड-मुंबई विशेष रेल्वेने ३६९ प्रवासी रवाना, पहिल्याच दिवशी शंभर टक्के प्रतिसाद
अमानुष प्रकाराने ग्रामस्थ हादरले
पोलिस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर, सहायक पोलिस निरीक्षक विजय रामोड यांच्यासह कर्मचाऱ्यांनी डिगांबरला ताब्यात घेतले. सहायक पोलिस निरीक्षक विजय रामोड तपास करीत आहेत. दरम्यान, या अमानुष प्रकाराने कुटुंबीय व ग्रामस्थ हादरले असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. डिगांबरच्या या कृत्यामागचे नेमके कारण समजू शकले नाही, तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. अभिराज हा आई-वडीलांना एकलूता एक मुलगा असल्याचे तसेच गावातील ही अनपेक्षित घटना घडल्याची माहिती मिळाली. घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी पोलिस तपास व रात्री उशिरापर्यंत याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सेलू पोलिस ठाण्यात सुरू असलेल्याची माहिती पोलिसांनी दिली.
हेही वाचा - Video- महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भाजपची परभणीत निदर्शने
वीज कोसळून युवकाचा मृत्यू
मानवत ः शेतात काम करीत असताना अंगावर वीज पडून सतरा वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील नागरजवळा शिवारात सोमवारी (ता.१२) दुपारी तिन वाजण्याच्या सुमारास घडली. गोरक्ष बालाजी रासवे हा आई वडिलांसह नागरजवळा शिवारातील आपल्या शेतात कापलेले सोयाबीन गोळा करण्याचे काम करीत होता. दुपारी विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरवात झाली होती. या वेळी अंगावर वीज कोसळुन गोरक्ष बालाजी रासवे याचा मृत्यू झाला. या प्रकरणी मानवत पोलिस स्टेशनला आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली.
संपादन ः राजन मंगरुळकर