esakal | उमरग्यात दोन दिवसांत कोरोनाचे १२ रूग्ण, एका पोलिस अधिकाऱ्यासह चार कर्मचारी पॉझिटिव्ह

बोलून बातमी शोधा

Umarga Corona Updates }

फेब्रुवारी महिन्यात संसर्ग वाढायला सुरुवात झाली. मार्च महिन्याचा पहिला आठवडाही निरंक गेला नाही. उलट संख्या वाढत आहे. गेल्या दोन दिवसांत बारा पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झाली आहे.

उमरग्यात दोन दिवसांत कोरोनाचे १२ रूग्ण, एका पोलिस अधिकाऱ्यासह चार कर्मचारी पॉझिटिव्ह
sakal_logo
By
अविनाश काळे

उमरगा (जि.उस्मानाबाद) : उमरगा शहरासह तालुक्यात गेल्या महिनाभरापासून कोरोना संसर्गाचे रुग्ण वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. दरम्यान उमरगा पोलिस ठाण्यातील एक अधिकारी व चार कर्मचाऱ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पोलिस कर्मचारी हतबल होत आहेत. तरीही त्यांना नियमित कामाला सामोरे जावे लागत आहे.
उमरगा तालुक्यात कोरोनाच्या संसर्गाने आतापर्यंत दोन हजार ३७५ पॉझिटिव्ह रुग्णांचा टप्पा पूर्ण होतोय. मध्यंतरी संसर्ग कमी झाल्याचे चित्र होते. मात्र नवीन वर्षातील जानेवारी महिन्यात हळूहळू संसर्ग सुरू झाला.

फेब्रुवारी महिन्यात संसर्ग वाढायला सुरुवात झाली. मार्च महिन्याचा पहिला आठवडाही निरंक गेला नाही. उलट संख्या वाढत आहे. गेल्या दोन दिवसांत बारा पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झाली आहे. शनिवारी (ता.सहा) आरटीपीआरच्या अहवालात गुंजोटी व तुरोरी येथील प्रत्येकी दोन तर शहरातील शिवपूरी कॉलनीतील तीन तर कोराळ येथील एक जण पॉझिटिव्ह आले आहे. रॅपिड चाचणीत सहायक पोलिस कर्मचारी, एक पोलिस कर्मचारी तर एक एकोजी मुदगडचा रुग्ण पॉझिटिव्ह आला आहे. रविवारच्या रॅपिड चाचणीत एक पोलिस कर्मचारी पॉझिटिव्ह आला आहे तर दोन दिवसापूर्वी दोन कर्मचारी पॉझिटिव्ह आले आहेत.


संपादन - गणेश पिटेकर