covid 19
covid 19covid 19

Marathwada Corona Update: मराठवाड्यात २१० नवे कोरोना रुग्ण, तीन मृत्यू

कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. त्यामुळे बीड आणि उस्मानाबाद जिल्हा वगळता मराठवाड्यातील इतर जिल्ह्यातील रुग्णसंख्याही कमी होत आहे
Summary

कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. त्यामुळे बीड आणि उस्मानाबाद जिल्हा वगळता मराठवाड्यातील इतर जिल्ह्यातील रुग्णसंख्याही कमी होत आहे

औरंगाबाद: Marathwada Corona Update: मराठवाड्यात बुधवारी (ता.१८) २१० जणांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. उपचारादरम्यान तीन रुग्णांचा मृत्यू झाला. आजही बीड जिल्ह्यातच सर्वाधिक १०० रुग्ण आणि दोन मृत्यूची नोंद झाली. त्या पाठोपाठ उस्मानाबाद जिल्ह्यात ४५ रुग्ण आढळले. कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. त्यामुळे बीड आणि उस्मानाबाद जिल्हा वगळता मराठवाड्यातील इतर जिल्ह्यातील रुग्णसंख्याही कमी होत आहे.

बुधवारी परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात प्रत्येक एक रुग्ण आढळला. या दोन्ही जिल्ह्यात मृत्यूची नोंद झाली नाही. नांदेड जिल्ह्यात सात जणांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. एका रुग्णाचा मृत्यू झाला. लातूर जिल्ह्यात २२ नवे रुग्ण आढळले.

covid 19
परभणी पालिकेसह जिल्हा परिषदेवरही भगवा, खासदार जाधवांना विश्वास

औरंगाबाद जिल्ह्यात मृत्यूची नोंद झाली नाही. १६ नवीन रुग्णांची भर पडली. जालना जिल्ह्यात १८ रुग्णांची भर पडली तर १ रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे १ हजार १८४ जणांचा बळी गेलेला आहे. जिल्ह्यात एकूण ६१ हजार ६८० बाधितांपैकी आतापर्यंत ६० हजार ४१८ रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या जिल्ह्यात ७८ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com