
बीड : कोविड संसर्गाने जगाला हैराण केले. त्या काळात शासनानेही उपाय योजनांसाठी निधी देताना हात सैल ठेवला. मात्र, निधीतून अत्यावश्यक बाबींऐवजी किरकोळ बाबींवर कोट्यावधींचा खर्च झाला. ‘सकाळ’ने सातत्याने कोविडमधील उधळपट्टी चव्हाट्यावर आणली. मात्र, या उधळपट्टीत चौकशीत ठपका असलेल्या अधिकाऱ्यांची भलीमोठी यादी आहे. तत्कालिन मंत्र्यांचा राजकीय हस्तक्षेपही या उधळपट्टीला कारणीभूत होता.