उदगीरात अवघ्या दोन दिवसांत कोरोनाचे ७३ रुग्ण वाढले, नऊ रुग्णांना सोडले घरी

युवराज धोतरे
Thursday, 17 September 2020

उदगीर येथील कोविड रुग्णालयात बुधवारी (ता.१६) व गुरुवारी (ता.१७) या दोन दिवसांत ७३ रुग्ण कोरोना बाधित आढळले आहेत. नऊ रुग्णांवर उपचार करून घरी सोडण्यात आले आहे, तर उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला आहे.

उदगीर (जि.लातूर) : उदगीर येथील कोविड रुग्णालयात बुधवारी (ता.१६) व गुरुवारी (ता.१७) या दोन दिवसांत ७३ रुग्ण कोरोना बाधित आढळले आहेत. नऊ रुग्णांवर उपचार करून घरी सोडण्यात आले आहे, तर उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला आहे. येथील कोविड रुग्णालयात बुधवारी आरटीपीसीआर तपासणीमध्ये ६८ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असुन अँटिजेन तपासणीमध्ये पाच रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी : वैद्यकीय पदव्युत्तर परीक्षेचा निकाल लागणार लवकर

इतर ठिकाणाहून सहा रुग्णाला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. बुधवारी ९ रुग्णांना उपचारानंतर सुटी देण्यात आली आहे. हरकरे नगर भागातील ७० वर्षीय पुरुष रुग्णाचा उपचारादरम्यान दुर्दैवाने मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.सतीश हरिदास व कोविड रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ.शशिकांत देशपांडे यांनी दिली आहे.

उदगीरच्या कोविड रुग्णालयात आतापर्यंत एकूण एक हजार ५४६ कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून यापैकी ७९१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या येथील कोवीड रुग्णालयात ५१, उदयगिरी नेत्र रुग्णालयाच्या कोविड हॉस्पिटल १६, तोंडार पाटी येथील कोविड केअर सेंटर मध्ये ४७ , जय हिंद पब्लिक स्कुल येथील कोविड केअर सेंटर येथे १४ आणि होम आयसोलेशनमध्ये २६ असे एकूण १९२ कोरोना बाधित रुग्णावर उपचार चालू आहेत. आत्तापर्यंत एकूण ६३ जणांचा मृत्यू झाला आहे अशी माहीती अतीरीक्त जिल्हा शल्यचिकित्सक व कोवीड रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. देशपांडे यांनी दिली आहे.

विकास कामांचे निमित्त; क्षीरसागर काका-पुतणे पुन्हा आमने सामने

गुरुवारी सकाळी आलेल्या अहवालात एसटी कॉलनी १, डी एड कॉलनी १, महादेव नगर २, रुद्रा नगर १, हॉवगीस्वामी चौक ३, बिदर गेट १, येणकी १, एनएसबी कॉलनी १, निडेबन १, विकास नगर १, बनशेळकी रस्ता २, हरकरे नगर १, डॅम रस्ता १, हंडरगुली१, निडेबन रस्ता ३, नाईक चौक १, डोंगरज १, लोहारा १, उदगीर ग्रामीण १, उमरगा (जळकोट) १, समर्थ वसाहत १, किणी १, नळगीर १, येरोळ (शिरूर अनंतपाळ) १, सावरगाव (औराद) १, मुक्रमाबाद १, संतकबीर नगर १, शिरूर ताजबंद १, समता नगर १, जळकोट १, बिदर रोड २, शास्त्री कॉलनी १, अंबिका कॉलनी १, हणेगाव (देगलुर) १ अशा एकूण ४२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Covid Positive 73 Patients Increase Within Two Days Udgir News