Beed News: बीडमधील अहिल्यानगर रस्त्याची दुरवस्था टोकाला गेली असून, नागरिकांनी गाळात लोटांगण घालत तीव्र निषेध केला. दहा वर्षांपासून प्रलंबित मजबुतीकरणाचे काम अजूनही सुरु झालेले नाही.
बीड : शहरातील अंकुशनगर, संत नामदेव नामदेवनगर, पालवण चौक, बापूजीनगर तसेच पालवण, वरवटी, धानोरा, चऱ्हाटा आदी गावांना जोडणाऱ्या आणि प्रमुख बाजारपेठ असलेल्या अहिल्यानगर रस्त्याची दुरवस्था झाली आहे.