‘या’ निरीक्षकावर अपहाराचा गुन्हा

प्रल्हाद कांबळे
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

नांदेड : व्यवसाय परवाना व नुतणीकरण शुल्काची जमा झालेली एक लाख ४६ हजार रुपयाची रक्कम आपल्या फायद्यासाठी वापरून अपहार केला. या प्रकरणी महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालय चारचे स्वच्छता निरीक्षकावर वजिराबाद पोलिस ठाण्यात शुक्रवारी (ता. १५) अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे. 

नांदेड : व्यवसाय परवाना व नुतणीकरण शुल्काची जमा झालेली एक लाख ४६ हजार रुपयाची रक्कम आपल्या फायद्यासाठी वापरून अपहार केला. या प्रकरणी महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालय चारचे स्वच्छता निरीक्षकावर वजिराबाद पोलिस ठाण्यात शुक्रवारी (ता. १५) अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे. 

महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालय क्रमांक चार अंतर्गत स्वच्छता निरीक्षक वसीम हुसेन तडवी हे कार्यरत आहेत. त्यांच्याकडे या क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या दुकानांचा परवाना नुतणीकरण व नविन व्यवसायाचा परवाना देण्याची जबाबदारी होती. त्यांनी एक एप्रील २०१८ ते ३१ मार्च २०१९ या काळात व्यवसाय परवाना आणि नुतणीकरण यातून एक लाख ४६ हजार ८२० रुपये जमा केले. ही शासकिय रक्कम महापालिकेच्या बँक खात्यात जमा करणे त्याचे कर्तव्य होते. परंतु त्यांनी वरिष्ठांची दिशाभूल करून जमा झालेली वरिल रक्कम आपल्या फायद्यासाठी वापरून शासकिय रक्कमेचा अपहार केला. ही बाब तपासणीत उघड झाल्याने एकच खळबळ उडाली. 

महापालिका आयुक्त लहुराज माळी यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. त्यांच्या आदेशावरून क्षेत्रीय कार्यालय क्रमांक चारचे सहाय्यक आयुक्त प्रकाश गच्चे यांनी वजिराबाद पोलिस ठाण्यात जावून वसिम हुसेन तडवीविरूध्द रितसर तक्रार दिली. पोलिस निरीक्षक संदीप शिवले यांनी या प्रकरणाची पुन्हा चौकशी करून अखेर श्री. तडवीविरुध्द शासकिय रक्कमेचा अपहार केला म्हणून गुन्हा दाखल केला. तपास पोलिस उपनिरीक्षक श्री. पन्हाळकर करित आहेत. 

हे ही वाचा

मांडवीत एकाच रात्री पाच दुकाने फोडले 

व्यापाऱ्यात भितीचे वातावरण

नांदेड :  मांडवी (ता. किनवट) येथील कोठारी फाट्यावर असलेले सराफा दुकानसह मोबाईल शॉपी आणि इतर तीन दुकाने एकाच रात्री फोडून अज्ञात चोरट्यांनी शुक्रवारी (ता. १५) रात्री एक लाख ५४ हजाराचा मुद्देमाल लंपास केला. 

मांडवी येथील कोठारी फाट्यावर मोठी बाजारपेठ आहे. येथे चंदुसिंग धरमसिंग मांडन यांचे श्री. साई ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. त्यांच्या शेजारीच अन्य सामानाचे दुकाने आहेत. शुक्रवारी (ता. १५) रात्री सर्व दुकानदार आपआपली दुकाने बंद करून घरी गेले. रात्रीचा अज्ञात चोरट्यांनी फायदा घेत सराफा दुकानासह मोबाईल शॉपीतील ३८ मोबाईल व इतर दुकाने फोडून त्यातील सामान असा जवळपास एक लाख ५४ हजार ५५० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. 

ही बाब सकाळी उघडकीस आल्यानंतर मांडवी पोलिस ठाण्यात चंदुसिंग मांडन यांनी तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरुन घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार श्री. कऱ्हाळे करित आहेत. एकाच रात्री पाच दुकाने फोडून चोरट्यांनी पोलिसांना आव्हान दिले आहे. यामुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The crime of abduction on 'this' inspector