esakal | हिंगोली शहरात जुन्या वादावरून एकास भोसकले
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

हिंगोली शहरात जुन्या वादावरून एकास भोसकले

sakal_logo
By
राजेश दार्वेकर

हिंगोली: शहरात जून्या वादातून एकास चाकूने भोसकल्याची घटना सोमवारी (ता. १२) सायंकाळी सहा ते साडेसहाच्या दरम्यान घडली आहे. जखमी युवकावर येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड येथे नेण्यात आले आहे. तर चाकु भोसकलेल्याचा पोलीस शोध घेत आहेत.

हिंगोली शहरातील गवळीपूरा भागातील सचिन ऊर्फ पिंटू बालगुडे हे सोमवारी सायंकाळी सहा ते साडेसहा वाजण्याच्या सुमारास डॉ . बाबासाहेब आंबेडकर चौक येथे उभे होते . यावेळी तेथे शेख फेरोज हा तेथे आला . त्यानंतर त्या दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादानंतर शेख फेरोज याने पिंटू यांच्या पाठीत चाकूचा वार केला त्यामुळे मोठा रक्तस्त्राव सुरु झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख , हिंगोली शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक पंडीत कच्छवे , सहाय्यक पोलिस निरीक्षक कातमांडे , जमादार गजानन होळकर यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

हेही वाचा: चांगली बातमी! अखेर पोलिस भरतीची प्रतिक्षा संपली

पोलिसांनी गंभीर जखमी असलेल्या पिंटू बालगुडे यास उपचारासाठी शासकिय रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला उपचारासाठी नांदेड येथील शासकिय रुग्णालयात हलविले आहे. या प्रकरणात पोलिसांनी शेख फेरोज याचा शोध सुरु केला आहे. जून्या वादातून झाल्याची शक्यता पोलिस व्यक्त करीत असून या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.

loading image