Crime News: किरकोळ कारणावरून उदगीरात एकाचा खून

युवराज धोतरे 
Saturday, 30 January 2021

कमरेच्या बेल्टने मारहाण झाल्याने या इसमाचा मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे

उदगीर (लातूर): किरकोळ कारणावरून भालकी (जि.बिदर) येथील एका युवकाचा येथील बिदर रेल्वे उड्डाणपुलाखाली शनिवारी (ता. ३०) पहाटे खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.

याबाबत ग्रामीण पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की पहाटेच्या सुमारास पायी वाकिंगला जाणाऱ्या नागरिकांना एक युवक मृत अवस्थेत पुलाखाली पडला असल्याचे आढळून आले. त्यानंतर काही नागरिकांनी ग्रामीण पोलिसांना फोनवर या घटनेची माहिती दिली.

प्रशासनाचा कारभार काही कळेना! पशुचिकित्सा पथक पहिल्या परिपत्रकात मंजूर मात्र...

ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अशोक घारगे त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. या मयताची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला. या भागातील सीसीटीवी फुटेज तपासल्यानंतर उमेश मुरलीधर उखंडे (वय-४०) रा सोनार गल्ली, भालकी (कर्नाटक) या इसमाचा खून झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. उपविभागीय पोलिस अधिकारी डॅनियल बेन, ग्रामीणचे पोलिस निरीक्षक दिपककुमार वाघमारे यांनी घटनास्थळाला भेट देऊन सीसीटीव्ही फुटेज आधारे घटनास्थळाच्या शेजारील लॉजचा कर्मचारी युवराज पाटील यास ताब्यात घेतले आहे.

कमरेच्या बेल्टने मारहाण झाल्याने या इसमाचा मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या मयताचे प्रेत येथील सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी बीट अंमलदार श्री रंगवाळ, डीबी पथकाचे नामदेव सारूळे, चंद्रकांत कलमे, तुळशीदास बरूरे, राहुल गायकवाड आदींनी पुढाकार घेतला आहे.

निवडणुकीपेक्षा खर्च दाखल करण्याची प्रक्रिया किचकट, उमेदवारांच्या प्रतिक्रिया

पुन्हा ग्रामीण हद्दीत खून-
सध्या उदगीर ग्रामीण पोलीस ठाणे चांगलेच चर्चेत आले आहे ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीत खुणाच्या अनेक घटना घडत आहेत. हैबतपुर येथील एका खून प्रकरणामुळे उदगीर शहरात दगडफेक झाली व वातावरण तणावपूर्ण निर्माण झाले होते. अनेक ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल झाले आहेत.त्यातच शनिवारी घडलेल्या खुनाच्या गुन्ह्यामुळे पुन्हा ग्रामीण पोलीस ठाणे चर्चेत आले आहे.

(edited by- pramod sarawale)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crime News Murder in Udgir police arrested one person on cctv footage