Crime News: बीड हादरलं! विधवा महिलेवर चालत्या जीपमध्ये केला बलात्कार अन्...

विधवा महिलेवर दोघांनी चालत्या जीपमध्ये बलात्कार केला आहे
Crime News
Crime NewsEsakal

बीड जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विधवा महिलेवर चालत्या जीपमध्ये बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. संतापजनक म्हणजे या महिलेच्या प्रियकरासमोर दोघांनी तिच्यावर अत्याचार करण्यात आला आहे. या प्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलिसांत महिलेच्या प्रियकरासह अन्य तिघांवर गुन्हा दाखल झाला. अत्याचार केल्यावर या महिलेला एका गावात नेऊन दुसऱ्या एका महिलेने पाईप आणि चप्पलने मारहाणही केल्याचा आरोपही पोलिसांत दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत करण्यात आला आहे.

शहरातील शिवाजी नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका २६ वर्षीय महिलेच्या पतीचे पाच वर्षांपूर्वी निधन झालेले आहे. मागील एक वर्षापासून सदर महिलेचे एका व्यक्तीसोबत प्रेमसंबंध आहे. दोघेही बीड येथेच सोबत राहतात. दरम्यान, शुक्रवारी (ता. चार) सदर महिला बार्शी रोड येथून जात असताना त्याठिकाणी जिपमधून उतरलेल्या तिच्या प्रियकराने तिला गाडीत मधल्या सीटवर बसविले.

Crime News
Uddhav Thackrey: 'देवेंद्रजी मस्टर मंत्री नाही तर मास्टर, त्यांच्या...'; बावनकुळेंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

जीप बार्शी नाक्याच्या दिशेने निघाली. त्याच वेळी गाडीत बसलेल्या प्रियकराच्या भावाने व अन्य एका व्यक्तीने चालत्या गाडीतच महिलेचे केस धरून तिचे डोके गाडीच्या दारावर आदळले. यानंतर तिच्यावर दोघांनी जबरदस्तीने अत्याचार केल्याचे पिडीतेने फिर्यादीत म्हटले आहे. त्यांनतर गाडी तशीच सात्रा पोत्रा परिसरात नेली. तिथेही प्रियकराच्या घरातील काही जणांनी पीडित महिलेला बेदम मारहाण केली. याप्रकरणी सुरेश लंबाटे याच्यासह अमोल लंबाटे, बापूराव हावळे व एक महिला अशा चौघांविरुद्ध शिवाजी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

Crime News
Maharashtra Live Blog Updates : हैदराबाद विमानतळावर जवळपास २ कोटींचं सोनं जप्त, अंतर्वस्त्रात लपवून आणण्याचा प्रयत्न

दरम्यान घटनेची माहिती मिळताच नेकनूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले, त्यानंतर त्यांनी पीडित महिलेची सुटका करत, तिला बीड येथील सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, सुरेश नामदेव लंबाटे, अमोल नामदेव लंबाटे, बापूराव हावळे व सविता सुरेश लंबाटे (सर्व रा. सात्रापोत्रा, ता.बीड) यांच्याविरुद्ध बीड शहरातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime News
Mumbai Crime News : बहिणीच्या लिव्ह-इन पार्टनरला भावांनी संपवलं; डोक्यात हातोडा घातला अन्...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com