Farmer Suicide Case : शेतकरी कुटुंबातील दांपत्याची आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news Suicide of couple in farmer family washi Sharad Purnima

Farmer Suicide Case : शेतकरी कुटुंबातील दांपत्याची आत्महत्या

वाशी : अल्पभुधारक शेतकरी कुटुंबातील दांपत्याने घरी एकाच दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दसमेगाव (ता.वाशी) येथे रविवारी (ता. ८) सकाळी आठच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्येमागचे नेमके कारण समजू शकले नाही. बाबूराव रघुनाथ उगडे व पत्नी सारीका बाबुराव उगडे यांनी काल दिवसभरात दैनदिन कामे उरकली. कोजागिरी पोर्णिमेनिमित्त घरी महाप्रसादाच्या कार्यक्रमाची तयारी करुण रात्री झोपी गेले.

आज सकाळी आठ वाजले तरी दोघेही घराबाहेर न पडल्याचे शेजाऱ्यांच्या लक्षात आले. काही ग्रामस्थानी घरी पाहाणी केली असता बाबूराव उगडे, सारीका उगडे यांनी एकाच दोरीने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. शिवाजी राजेंद्र उगडे यांनी माहिती दिल्यावर वाशीचे पोलिस निरिक्षक सुरेश बुधवंत, उपनिरिक्षक प्रियंका फंड आदींनी पंचनामा केला. दांपत्याच्या मागे दोन मुली, मुलगा असा परिवार आहे. एक मुलगी विवाहित असून दुसरी मुलगी बार्शी तर मुलगा परांडा येथे शिक्षण घेत आहे.

महाप्रसादाची केली होती तयारी

गावात नवरात्रोत्सवानंतर ग्रामस्थ देवीची मूर्ती या दांपत्याच्या घरात ठेवतात. अनेक वर्षांपासूनची ही परंपरा आहे. कोजागिरी पोर्णिमेला हे दांपत्य दिवीची विधीवत पूजा करुण ग्रामस्थांसाठी महाप्रसादाचे आयोजन करते. यावेळीही दांपत्याने महाप्रसादाची तयारी कालच करून ठेवली होती. काहीना निमंत्रणह दिले होते. मात्र महाप्रसादाऐवजी कुटुंबीय, नातेवाईक, ग्रामस्थांना दुखःद प्रसंगाला सामोर जावे लागल्याची भावना व्यक्त केली जात होती. दांपत्याच्या आत्महत्येमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.