Crime News : हॉस्पीटलचा संपर्क क्रमांक ऑनलाईन शोधणे महागात! OTP देताच तीन दिवसांत अडीच लाख गायब

otp fraud
otp fraudesakal

छत्रपती संभाजीनगर : हॉस्पीटलचा ऑनलाईन संपर्क क्रमांक शोधणे एका सरकारी नोकरदाराला चांगलेच महागात पडले. इंटरनेटवर ऑनलाईन क्रमांक शोधतानाच सायबर भामट्याने ‘हॉस्पीटल सर्विस’ या नावाने फोन करुन ‘तुमचा हॉस्पिटलचा नंबर लागला असून तुम्हाला एक लिंक पाठवली असून त्यावरुन पेशंटचे नाव, पत्ता आणि दहा रुपये चार्जेस भरा’ असे सांगितले.

otp fraud
Mumbai : गोरेगाव-मुलुंड उड्डाण पुलाच्या कंत्राटाबाबत अभ्यास करूनच निर्णय; आयुक्तांचे स्पष्टीकरण

त्यानंतर फिर्यादीला आलेल्या लिंकवर क्लिक करुन दहा रुपये भरले, दरम्यान आलेला ओटीपी ही दिला असता, फिर्यादीच्या खात्यातून तब्बल दोन लाख ४४ हजार ९९६ रुपये कमी झाले. हा प्रकार ११ ते १४ एप्रिलदरम्यान पडेगावात घडला.

याप्रकरणी विजय रामदास सोनवणे यांनी ११ एप्रिल रोजी यांनी मुलाला दवाखान्यात नेण्यासाठी उस्मानपुरा भागातील एका हॉस्पीटलच्या नावाने इंटरनेटवर संपर्क क्रमांक शोधत होते. दरम्यान त्यांना एका क्रमांकावरुन फोन आला व त्यांनी सांगितले की, ‘तुमचा हॉस्पीटलचा नंबर लागला असून तुम्हाला एक लिंक पाठवली आहे, त्यावर पेशंटचे नाव, पत्ता, दहा रुपये चार्जेस भरा असे सांगितले.

otp fraud
Ramesh Kadam : माजी आमदार रमेश कदम यांना 6 वर्षानंतर जामीन! अण्णाभाऊ साठे महामंडळात केला होता गैरव्यवहार

अवघ्या काही क्षणातच सोनवणे यांना दुसऱ्या नंबरवरुन एक लिंक मिळाली. सदर लिंकवर क्लिक करुन सोनवणे यांनी त्यांच्या मुलाचा तपशील भरला, व संबंधित पेटीएमच्या लिंकवर युपीआयने दहा रुपये पाठविले. त्यानंतर सोनवणे यांना एक ओटीपी आला, सदर ओटीपी समोरील व्यक्तीला दिला असता, सोनवणे यांच्या एसबीआय बॅंक खात्यातून ९९ हजार ९९८ रुपये कपात झाले.

तसेच १३ एप्रिल रोजीही ९४ हजार ९९९ आणि १४ एप्रिल रोजी ४९ हजार ९९९ असे तीन दिवसांत एकूण दोन लाख ४४ हजार ९९६ रुपये खात्यातून कपात झाले. याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात फसवणूकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलिस निरीक्षक कैलास देशमाने करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com