Crime News : विवाहितेवर अत्याचार करून पतीस व्हिडीओ पाठवले ;पतीची आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News video sent to husband torturing married woman husband committed suicide

Crime News : विवाहितेवर अत्याचार करून पतीस व्हिडीओ पाठवले ;पतीची आत्महत्या  

पारध : भोकरदन तालुक्यातील एका गावातील विवाहितेवर अत्याचार केला. शिवाय तिच्याशी फोनवर झालेल्या संभाषणाचे रेकॉर्डिंग तिच्या पतीला पाठवले. त्यामुळे पतीने आत्महत्या केली. या प्रकरणी विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरून पारध पोलिस ठाण्यात रविवारी (ता. २०) रात्री उशिरा पाच जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे, विनयभंग आणि बलात्काराचा गुन्हा नोंद करण्यात आला.

पीडितेने दिलेल्या तक्रारीचा आशय असा

संशयित गजानन अशोक देशमुख, रवी दत्तात्रय सपकाळ, गजानन दिलीप शिरसाठ आणि अन्य दोन महिलांनी पीडितेला संशयित रवी दत्तात्रय सपकाळ याच्याशी फोनवर बोलण्यास भाग पाडले. त्यानंतर गुंगीचे औषध देऊन तिच्यासोबत अश्लील चाळे केले. त्याचे चित्रीकरण मोबाइलमध्ये केले. शिवाय तिच्यासोबत जबरदस्ती संबंध ठेवण्यात आले. या सगळ्या प्रकारानंतर पीडित महिला आणि संशयित आरोपी तरुण यांच्या संभाषणाच्या ऑडिओ क्लिप पीडित महिलेच्या पतीला पाठवल्या. त्यामुळे बदनामी झाल्याने महिलेच्या पतीने आत्महत्या केली, असा आरोप तक्रारीत करण्यात आला. त्याआधारे गुन्हा नोंद झाला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक रमेश रूपेकर करीत आहेत.