

Sand Mining Tender Dispute: Gang Attacks Contractor for 'Hafta' in Hiradpuri
विहामांडवा : गोदावरी नदीकाठावरील हिरडपुरी (ता. पैठण) येथे वाळू उपसा टेंडरचे काम सुरू असताना हप्त्याच्या पैशांवरून झालेल्या वादातून तिघांनी टेंडरधारकास मारहाण करत पोकलॅंड मशीनची तोडफोड केली व गल्ल्यातील २५ हजार रुपये जबरदस्तीने नेल्याची घटना गुरुवारी (ता.३० एप्रिल) दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.