कड्यात अवैध मार्गाने प्रवेश करणाऱ्या तीन जणांवर गुन्हे

सकाळ वृत्तसेवा
Monday, 11 May 2020

पुणे येथून पारगाव कडा या मूळगावी आलेल्या मल्हारी मारुती जाधव, अनिल गोरख चितळे, अनिता अनिल चितळे यांनी चोरट्या मार्गाने गावात प्रवेश केला म्हणून ग्रामसेवक आबासाहेब खिलारे यांच्या फिर्यादीवरून आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. 

कडा (जि बीड) -कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन विविध प्रकारच्या उपाययोजना करीत असतानाही बाहेरील जिल्ह्यांतील काही व्यक्ती चेकपोस्ट चुकवून अवैधरीत्या आष्टी तालुक्यात प्रवेश करीत आहेत. प्रशासनाची नजर चुकवून चोरट्या मार्गाने कडा येथे प्रवेश केलेल्या तीन जणांवर आष्टी पोलिस ठाण्यात ग्रामसेवक आबासाहेब खिलारे यांच्या फिर्यादीवरून सोमवारी (ता. ११) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे येथून पारगाव कडा या मूळगावी आलेल्या मल्हारी मारुती जाधव, अनिल गोरख चितळे, अनिता अनिल चितळे यांनी चोरट्या मार्गाने गावात प्रवेश केला म्हणून ग्रामसेवक आबासाहेब खिलारे यांच्या फिर्यादीवरून आष्टी पोलिस ठाण्यात संचारबंदी आदेश डावलून चोरट्या मार्गाने विनापरवाना प्रवेश केला; तसेच जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करून कोरोना विषाणूचा संसर्ग पसरविण्याची भीती असताना प्रवेश केला म्हणून सोमवारी वरील तीन जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crimes against three people who entered illegally