Divisional Commissioner G. Shrikant
sakal
- रविंद्र गायकवाड
बिडकीन - बिडकीन शहर व परिसरात गावठाण हद्दीबाहेर मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या अवैध प्लॉटिंगची गंभीर दखल घेत, अवैध प्लॉटिंग करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिले. तसेच गावठाण हद्दीबाहेर बांधकाम परवानगी दिल्याची कबुली बिडकीनच्या ग्रामसेवकाने दिल्यानंतर, संबंधित ग्रामसेवकाला निलंबित करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिल्याने बैठकीत एकच खळबळ उडाली.