Beed News : सरकारच्या ‘लाडक्या’ बॅंकांकडून पीककर्जाला टाळाटाळ; चार बॅंकांकडून शेतकऱ्यांना दमडीही नाही
crop loan crisis : बीड जिल्ह्यात पीक कर्जाचे वितरण अतिशय कमी असून काही बँका शेतकऱ्यांना उभेही करत नाहीत. काही बँका व्यवसाय व वाहन कर्जालाही पीक कर्ज समजून चुकीची माहिती देत आहेत.
बीड : विविध कारणांनी कायम संकटात असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज वेळेत भेटत नाही किंवा पीक उशिरा भेटते हा देखील कळीचा मुद्दा आहे. यंदाही बॅंकांचे ‘येरे माझ्या मागल्या’ असेच सुरु आहे.