Crops Revive But Water Scarcity
sakal
पाचोड - अर्धाधिक पावसाळा आटोपता झाला. मात्र अद्यापपावेतो समाधानकारक पाऊस न झाल्याने पाचोडसह पैठण तालुक्यातील सर्व नदीनाले, विहीरी, तलाव आदी जलसाठे कोरडेठाक आहेत. एवढेच नव्हे तर अधूनमधून होणाऱ्या रिमझिम पावसावर खरिपाची पिके तराळली असली तरी जलसाठे कोरडे राहून भविष्यातील पाणीटंचाईने प्रत्येकाच्या मनात चिंतेचे घर निर्माण केले आहे. उर्वरित पावसाची मदार आता मोजक्या नक्षत्रावर अवलंबून आहे.