कोट्यावधी रुपयांच्या धान्य वाटप प्रकरणाची होणार चौकशी- हिंगोली जिल्हाधिकारी

हिंगोली तालुक्यात १६५ स्वस्त धान्य दुकानदार असून या दुकानदारांमार्फत शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्याचे वाटप केले जाते. त्यासाठी तहसील कार्यालयामार्फत त्यांना धान्य उचल करण्याचे परमीट देऊन त्यानुसार गोदामातून धान्य दिले जाते.
रुचेश जयवंशी
रुचेश जयवंशी

हिंगोली : हिंगोली तालुक्यातील १६५ रास्तभाव दुकानदारांना जानेवारी ते जुलै २०१९ या कालावधीत चार कोटी रुपयांचे दहा हजार क्विंटल धान्याची अतिरिक्त उचल तसेच ऑफलाईन पध्दतीने केलेल्या धान्य वाटप (Foods suplay) प्रकरणात जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी (Hingoli collector Ruchesh Jaivanshi) यांनी चौकशी करण्यासाठी पथक गठीत केले आहे. या प्रकरणाची चौकशी करुन तीन जुनपर्यंत उपविभागीय अधिकाऱ्यांच्या समितीकडे सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी काढले आहेत.

हिंगोली तालुक्यात १६५ स्वस्त धान्य दुकानदार असून या दुकानदारांमार्फत शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्याचे वाटप केले जाते. त्यासाठी तहसील कार्यालयामार्फत त्यांना धान्य उचल करण्याचे परमीट देऊन त्यानुसार गोदामातून धान्य दिले जाते. मात्र जानेवारी २०१९ ते जुलै २०१९ या कालावधीत तहसील कार्यालयाने अनेक स्वस्त धान्य दुकानदारांना अतिरिक्त धान्य दिले होते. याप्रकरणात तक्रार झाल्यानंतर उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, तहसीलदार पांडूरंग माचेवाड यांच्या पथकाकडून तपासणी करण्यात आली होती. यामध्ये दहा हजार क्विंटल थान्याचे अतिरिक्त वाटप झाल्याचे स्पष्ट झाले.

हेही वाचा - ब्लॅक फंगसचे रुग्ण उत्तर प्रदेश, दिल्ली, राजस्थान, महाराष्ट्र, मध्य प्रदेशमध्ये आढळून आले आहेत.

यामध्ये दोन हजार ८०० क्विंटल तांदूळ तर सहा हजार ८०० क्विंटल गव्हाचा समावेश आहे. या धान्याचे किमत चार कोटी रुपये आहे. या प्रकरणात आता तालुक्यातील १६५ स्वस्त धान्य दुकानदारांची चौकशी केली जाणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी पथक स्थापन केले आहे. या पथकाकडून रजिस्टर नुसार देय धान्य, परमीटनुसार दुकानदाराने उचललेले थान्य तसेच ई पॉसद्वारे ऑनलाईन वाटप केलेले धान्य, रजिस्टरनुसार अतिरिक्त उचल केलेले धान्य, ऑनलाईन व ऑफलाईन वाटप केलेले धान्य दुकानदाराचे विक्री रजिस्टर तपासले जाणार आहेत.

तीन जूनपर्यंत सर्व अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर केले जाणार आहे. या पथकात नायब तहसीलदार दत्तात्रय जोशी, सचिन जयस्वाल, निलेश पळसकर, पी. के. गायकवाड, बालाजी सुरनर, जी. एस. जिरगे, एस. आर. जिरंगे, एम. जी. खंडागळे, के. एम. विरकुवर, अशोक भोजने, यु. आर. बोधीकर, श्रीराम पाचपुते, प्रविण ऋषी, व्ही. व्ही. तेलंग, वैजनाथ भालेराव या नायब तहसीलदारांचा समावेश आहे. त्याच्या मदतीसाठी अव्वल कारकून व लिपीक, तलाठी यांची मदतनीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हिंगोली तालुक्यातील १६५ दुकानदारांच्या चौकशीतून तयार झालेल्या अहवालाच्या संकलनासाठी समिती स्थापन केली आहे. यामध्ये नायब तहसीलदार राजेंद्र गलगे, अव्वल कारकून संजय घुगे आदीचा समावेश आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com