Georai News : 'शिवशाही' महानाट्य पाहण्यास उसळली गर्दी; पाच मजली किल्ल्याची हुबेहुब प्रतिकृती अन् शोभिवंत सिंहासन पाहुन प्रेक्षक भारावले!

पाच मजली किल्ल्याची हुबेहुब प्रतिकृती, शोभीवंत सिंहासन मेघडंबरी, जहाजाचा वापर करुन महाराजांच्या कोकण मोहिमेचा जिवंत देखावा.
Shivshahi Mahanatya
Shivshahi Mahanatyasakal
Updated on

गेवराई - गेवराई शहरात आमदार विजयसिंह पंडित यांच्या संकल्पनेतून शारदा प्रतिष्ठान आणि राष्ट्रवादी सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्यात आज झालेल्या शिवशाही महानाट्याच्या पहिल्याच प्रयोगाला प्रेक्षकांची गर्दी उसळली होती.

महानाट्याचा आज बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक, माजी मंत्री शिवाजीराव पंडित, माजी आमदार विलासराव खरात, धाराशिव येथील एनईपी शुगरचे नानासाहेब पाटील, तहसिलदार संदिप खोमने, अभिनेते प्रकाश धोत्रे, महेश कोकाटे, डॉ. राजेश आहेर, रमेश रोकडे, दिग्दर्शक महेंद्र महाडिक यांच्यासह समितीचे अध्यक्ष शैलेश तोष्णीवाल, कार्याध्यक्ष संदिप मडके, रणविर पंडित यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते व शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन, शस्त्रपुजन, मुख्य रंगमंच पुजन, अश्वपुजन आणि श्री गणेशाची आरती करुन महानाट्याच्या प्रयोगाला प्रारंभ झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार सामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्यात काम आमदार विजयसिंह पंडित हे करत असून,राजा कसा असावा याचा आदर्श भावी पिढीला कळावा हाच हेतू आहे असे मत जिल्हाधिकारी अविनाश पाठक केले.तर गेवराई शहरात शिवरायांचे स्मारक व आश्वारुढ पुतळा उभारण्यात येईल असे आश्वासन आमदार पंडित यांनी केले.

शिवशाही महानाट्य पाहून प्रेक्षक भारावून गेले -

पाच मजली किल्ल्याची हुबेहुब प्रतिकृती, शोभीवंत सिंहासन मेघडंबरी, जहाजाचा वापर करुन महाराजांच्या कोकण मोहिमेचा जिवंत देखावा, भव्य राज्याभिषेक सोहळा, शिवकालीन शस्त्रास्त्रे व युद्ध साहित्य यासह अधुनिक ध्वनी व प्रकाश योजना, घोडे, बैलगाडी, पालखी, नेत्रदिपक आतषबाजी यांचा वापर करुन मराठा व पातशाही यांच्या तलवारींचा खणखणाट, तोफांचा गडगडाट, अग्नीबाणांचा वर्षाव असा घनघोर रणसंग्राम पाहून उपस्थित रसिक आणि शिवप्रेमी नागरिक भारावले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com