esakal | भारनियमनामुळे ग्रामस्थ करतायत गर्दी !
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

‘कोरोना’ च्या प्रतिबंधासाठी गर्दी टाळण्याच्या उदेश्याने शासनाने राज्यभर संचारबंदी लागू केली आहे.  परंतू, मानवत तालुक्यात स्वातंत्र्य फिडर अभावी फटका बसत आहे.

भारनियमनामुळे ग्रामस्थ करतायत गर्दी !

sakal_logo
By
प्रा.किशन बारहते

मानवत (जि.परभणी) : ‘कोरोना’ च्या प्रतिबंधासाठी गर्दी टाळण्याच्या उदेश्याने शासनाने राज्यभर संचारबंदी लागू केली आहे. नागरिकांना अत्यावश्यक कामा शिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले जात आहे. यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. परंतु तालुक्यातील बहुतांश गावाना मिक्स फीडर द्वारे विद्युत पुरवठा केला जात असल्याने नागरिकांना भारनियमनाच्या त्रास सहन करावा लागत आहे. भारनियमनामुळे ग्रामस्थ एका ठिकाणी गर्दी करून जमा होत आहेत.


मानवत तालुक्यातील ५३ गावाना ८ उपकेंद्राद्वारे वीजपुरवठा केला जाते. यात मानवत शहर १, मानवत शहर २, रूढी, कोल्हा, देवलगाव, पाळोदी, रामेटाकळी व रामपूरी या उपकेंद्रांचा समावेश होतो. विद्युत वितरण कंपनीद्वारे गावठाण व कृषी अशा दोन स्वातंत्र्य फीडरद्वारे वीजपुरवठा करणे अपेक्षीत आहे. यात गावठाण फिडरला भारनियमन न घेता विद्युत केला जातो तर शेतीसाठी १६ तासाचे भारनियमन घेतले जाते. तालुक्यातील मानवत शहरातील दोन उपकेंद्रात समाविष्ट भाग पूर्णपणे अकृषीक आहे. तर कोल्हा व रामपुरी येथील उपकेंद्रावर गावठाण व कृषी असे स्वातंत्र्य फिडर आहे. मानवत शहर व कोल्हा उपकेंद्रावरील १५ गावात सध्या भारनियमन घेतले जात नाही. परंतू, रामपुरी येथे स्वातंत्र्य फिडर असतानादेखील भारनियमन घेतले जात आहे.

हेही वाचा - ‘लॉकडाऊन’ने खासगी दवाखाने बंद


 ३८ गावात भारनियमन
अन्य पाच उपकेंद्रावरील ३८ गावात सध्या भारनियमन घेतले जात आहे. या गावात गावठाण व कृषी यांना एकाच फिडरवरुन पुरवठा केला जातो. यामुळे ८ तास थ्री फेज, ८ तास सिंगल फेज तर आठ तास भारनियमन घेतले जात आहे. विशेष बाब म्हणजे सकाळी चार तास व दुपारी चार तास अशा दोन सत्रात भारनियमन घेतले जात आहे. दुपारी उन्हाचा पारा वाढत वाढल्याने प्रचंड उकाडा होत असल्याने ग्रामस्थ घरात न थांबता पारावर व झाडाखाली गर्दी करत वेळ घालवत आहेत.

भारनियमन रद्द करण्याची मागणी
दोन दिवसात ढगाळ वातावरणामुळे उकाडा वाढला आहे. यामुळे ग्रामस्थ घराबाहेर पडत आहेत. पोलिस अधिकारी-कर्मचारी गावात गेले असता मोठ्याप्रमाणात ग्रामस्थ एकाच ठिकाणी गर्दी करीत असल्याचे आढळून येत आहे. यावर ग्रामस्थ भारनियमनाची समस्या पोलिसांसमोर मांडत आहेत. प्रशासनाने किमान २१ दिवस संचारबंदी राहणार असल्याचे जाहीर केले आहे. आवश्यकता पडल्यास यात वाढ होऊ शकते. पुढील काळात उन्हाचा चटका वाढेल यामुळे प्रभावी उपाययोजना करण्यासाठी भारनियमन रद्द करण्याची मागणी केली जात आहे. सध्या तरी प्रशासन कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करीत असताना भारनियमनामुळे अडथळा येत आहे.