माहेरवाशीण गौराईच्या स्वागतासाठी गृहिणींमध्ये आतुरता...उद्या होणार आगमन 

माहेरवाशीण गौराईच्या स्वागतासाठी गृहिणींमध्ये आतुरता
माहेरवाशीण गौराईच्या स्वागतासाठी गृहिणींमध्ये आतुरता
Updated on

परभणी - कोरोना विषाणु संसर्गाचे सावट असतानाही माहेरवाशीण गौराईच्या स्वागतासाठी महिला वर्गामध्ये उत्साह होता. मंगळवारी (ता. २४) रात्री गौराईचे आगमन होणार असल्याने गृहिणीमध्ये आतुरता दिसून आली. बाप्पाची भक्तीभावाने सेवा करताना गौराईची सेवा करण्यात काहीच कमतरता राहू नये, यासाठी भाविकांची लगबग सुरू होती. 

तेरड्याच्या पानापासून प्रसादासाठी केळीच्या पानापर्यंत, ओवश्यासाठी लागणाऱ्या सुपापासून ते फळाफुलांपर्यंतच्या पूजासाहित्याने बाजार नटला होता. गौरीला नेसवण्यासाठी हिरव्या रंगाच्या साड्या, नानाविध रंगाच्या दागदागिन्यांची खरेदी करण्यासाठी महिलावर्गाने गर्दी केली. 

महिलांचा आनंद द्विगुणित 
सुरेख रंगसंगतीमध्ये रंगवलेल्या मुखवट्यांच्या गौरीला यंदा सर्वाधिक मागणी होती. आपली गौराई सुंदर दिसावी, यासाठी साडीपासून दागिन्यांपर्यंतची खरेदी करण्यासाठी बाजारांमध्ये गर्दी दिसून येत होती. जरीकाम केलेल्या सुंदर साड्यांनी बाजार फुलून गेला होता. गौराईच्या दागिन्यांमध्ये मंगळसूत्र, लक्ष्मीहार, चंद्रकोरी, बोरमाळ, कंबरपट्टा, काचेच्या बांगड्या कोल्हापुरी नथींना असलेली मागणी अधिक होती. गौरी म्हणजे माहेरवाशीण, तिच्या आगमनाने महिलांचा आनंद द्विगुणित होत होता. 
 
हिंगोलीत घरोघरी लगबग सुरु 
हिंगोली - गणपती आगमनानंतर वेध लागतात गौरीच्या आगमनाचे. मंगळवारपासून (ता. २५) सुरू होणाऱ्या तीन दिवसांच्या या सणानिमित्त हिंगोलीत घरोघरी तयारी करण्यात आली असून विविध साहित्यांनी बाजारपेठ देखील फुलली आहे. कोरोना संकटामुळे यावर्षी सर्वच सणावर त्याचा परिणाम झाला आहे. शहरात १४ दिवसांच्या लाँकडाउननंतर नुकतीच बाजारपेठ सुरू झाली आहे. त्यानंतर गणपतीचे आगमन झाले. आता मंगळवारपासून गौरीचे आगमन होणार असल्याने त्याची तयारी घरोघरी सुरू झाली आहे. घरांची व जुने मखर काढून त्याची साफसफाई करणे, सणासाठी लागणारा किराणा तसेच विविध साहित्याची जमवाजमव करणे, फराळाचे साहित्य करण्याची घरोघरी लगबग सुरू झाली आहे. तर बाजारात देखील विविध वस्तू विक्रेत्यांनी या सणासाठी लागणारे साहित्य विक्रीस उपलब्ध केले आहे. 

विविध साहित्यांनी बाजारपेठ फुलली 
शहरातील गांधी चौकात महालक्ष्मीचे मुखवटे विक्रीला आले असून रेडिमेड महालक्ष्मी ही विक्रीस आल्या आहेत. आकर्षक महालक्ष्मीचे मुखवटे उपलब्ध आहेत. यात उभ्या महालक्ष्मी देखील आहेत. तसेच वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य तोरण, हार, सजावटीचे साहित्यासह लक्ष्मीच्या समोरील खेळणी, वेगवेगळ्या प्रकारचे रंगीबेरंगी हार व वेली, लाईटींग, वेगवेगळ्या प्रकारची झाडे, काचेचे झुंबर, वेगवेगळ्या प्रकारची रंगीबेरंगी रबरी व प्लॉस्टिकची फुले आदी साहित्य बाजारपेठेत विक्रीस आले आहेत. पुजेचे साहित्य, केळीची पाने, केळी, सोळा भाज्या, पंचखाद्य, भाजीपाला हे सर्व साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांची बाजारपेठेत गर्दी होत आहे. 

अजूनही कोरोनाचे सावट 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुकानदारही मास्क आणि सँनिटायझरचा वापर करून तसेच फिजीकल डिस्टंन्सिंगचे पालन करून ग्राहकांना माल विकत असल्याचे चित्र शहरातील बाजारपेठेमध्ये दिसून येत आहे. तसेच कोरोनाच्या काळामध्ये खबरदारी घ्यावी, असे वारंवार बाजारपेठेमधील दुकानदारांना प्रशासनातर्फे सूचना देण्यात येत आहेत. ग्राहकांसोबतच विक्रेते देखील नियमांचे पालन करीत बाजारात या वस्तूची विक्री करीत आहेत. 


संपादन - अभय कुळकजाईकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com