
कळंब (उस्मानाबाद) : महावितरणच्या उपविभागीय कार्यलयात गेल्या अनेक दिवसांपासून वीजमीटरचा खडखडाट निर्माण झाला आहे. त्यामुळे शेकडो नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. नवीन वीज जोडणीसाठी ग्राहकाने महावितरणकडे पैसे भरले आहे. ग्राहक गेल्या अनेक दिवसापासून वीजजोडणीच्या प्रतीक्षेत आहे. महावितरणकडे विजमीटर उपलब्ध नसल्याने कारण सांगून नागरिकांना अंधारात ठेवले जात असल्याचा विजकंपनीच्या गलथान कारभाराचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.
महावितरणच्या उपविभागीय कार्यलयाअंतर्गत शहरासाठी कनिष्ठ सहायक कार्यलय असून बाबनगर, परळी रस्ता आदी नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील संपूर्ण भाग येत आहे. विजमीटर उपलब्ध करून देण्याची मागणी कळंबच्या उपविभागीय वीज कार्यलयाने गेल्या अनेक महिन्यांपूर्वी महावितरणच्या वरिष्ठ कार्यलयाकडे केली असल्याची माहिती आहे. घरघुती, सिंगलफेज, थ्री फेजच्या शेकडो ग्राहकांनी विजमीटरसाठी अर्ज केले आहे. त्यात घरघुती वीज वापराच्या ग्राहकांची मोठी संख्या आहे.
परळी रस्त्यावरील मंगलबाई कांबळे महिला गृहिणीने ६ मार्च रोजी नवीन विजजोडनीचा अर्ज करून महावितरणकडे पैसेही भरले आहेत. परंतु विजमीटर उपलब्ध नसल्यामुळे तुम्हाला वीजपुरवठा करता येणार नसल्याचे सांगण्यात आले. विजमीटर आले का हे विचारण्यासाठी ग्राहकांना महावितरणच्या कार्यलयाकडे हेलपाटे मारावे लागत आहेत. महावितरणच्या उपविभागीय कार्यलयाकडे विजमीटरचा खडखडाट निर्माण झाल्याने ग्राहकांना मोठ्या मानसिक समस्येना तोंड द्यावे लागत आहे. एकीकडे महावितरण कंपनी ग्राहकांकडे असलेली थकबाकी वसुलीच्या कामात व्यस्त आहे. दुसरीकडे ग्राहकांनी नवीन विजजोडणीसाठी पैसे भरूनही त्यांना विजमीटर उपलब्ध करून देण्यात येत नसल्यामुळे विजजोडणीसाठी ग्राहकांना लटकत ठेवले जात आहे.
ग्राहक अंधारात
शहरातील शेकडो नागरिकांनी अधिकृत विजजोडणीसाठी महावितरण कार्यलयाकडे अर्ज केले आहेत. नियमानुसार डिमांड घेतले असून पैसेही भरले आहे. अधिकृत वीजपुरवठा करण्यासाठी नागरिक कार्यलयाकडे हेलपाटे मारत आहेत. विजमीटर उपलब्ध झाल्यास अधिकृत वीजपुरवठा सुरू करण्यात येईल, असे उत्तर महावितरणचे अधिकारी नागरिकांना देत आहेत. त्यामुळे शेकडो नागरिक अंधारात आहेत.
दोन दिवसात विजमीटर उपलब्ध होतील
शहरातील ३५ ग्राहक नवीन विजजोडीनीसाठी वेटिंगवर आहेत. विजमीटरची मागणी वरिष्ठ कार्यलयाकडे करण्यात आली असून दोन दिवसात विजमीटर उपलब्ध होतील असे विजकंपणीचे सहायक अभियंता वैभव गायकवाड यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.