Cyber Crime : फेसबुकवर ओळख, दुबई पोलिसांच्या नावाने अटक केल्याचे भासवत उकळले सव्वालाख रुपये
Dharashiv Crime : धाराशिवमध्ये फेसबुकवर ओळख निर्माण करून एका तरुणाला दुबई पोलिसांच्या अटकेची बतावणी करून एक लाख २० हजार रुपयांचा गंडा घातल्याचे प्रकरण समोर आले आहे. आरोपीने जिजा असल्याचे सांगत ऑनलाइन पैसे घेतले, मात्र त्याची फसवणूक झाल्याचे लक्षात आलं.
धाराशिव : फेसबुकवर ओळख निर्माण करून शहरात राहणाऱ्या तरुणाला एक लाख २० हजार रुपयांचा ऑनलाइन गंडा घातल्याचे प्रकरण समोर आले आहे. बहिणीचा पती बोलत असल्याचे सांगत आपल्याला दुबई पोलिसांनी अटक केली असल्याचे भासवून पैसे उकळण्यात आले.