परळी वैजनाथ - परभणी येथील १५ सायकलस्वारांनी परभणी ते पंढरपूर सायकल वारी काढली असून दोन दिवसात अंदाजे ३५० किलोमीटर अंतर कापणार आहेत. या सायकल वारीचे येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मित्रमंडळीच्या वतीने स्वागत करण्यात आले..परभणी येथील सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर यांनी आरोग्य चांगले राहावे यासाठी सायकल चालवणे सुरू केले आहे. हळूहळू यामध्ये जवळपास २०० ते २५० जण ज्यात विविध क्षेत्रातील आरोग्याची काळजी घेणारे सहभागी झाले. यातून सायकल चालवण्याची आवड निर्माण झाली..सध्या हे सर्व सायकलस्वार रोज ५० ते ६० किलोमीटर सायकल चालवतात, यातूनच पंढरपूर वारीची संकल्पना सुचली. यामध्ये काही डॉक्टर व युवक सहभागी झाले. शुक्रवारी (ता.२०) पहाटे ४ वाजता परभणी येथून सुरुवात झाल्यानंतर पहिल्या दिवशी जवळपास १२५ किलोमीटरवर कळंब येथे मुक्काम तर दुसरा मुक्काम थेट पंढरपूर मध्ये असणार आहे..तिसऱ्या दिवशी पंढरपूर येथे सकाळी सायकलवर प्रभात फेरी, नगर प्रदक्षिणा, सायकल रिंगण सोहळा पूर्ण करून पांडुरंगाचे दर्शन व महाप्रसाद घेऊन रेल्वेने परतीचा प्रवास होईल. या सायकल वारी मध्ये सर्वज्ञ पवार या ११ वर्षाच्या मुलाचाही समावेश आहे. आतापर्यंत या सायकल स्वारांनी नांदेड, औरंगाबाद, जालना सायकल फेरी काढलेली आहे..या सायकल वारीचे येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शनैश्वर प्रतिष्ठान व मित्रमंडळाच्या वतीने स्वागत करण्यात आले. या सायकल वारीमध्ये प्रभावती रायडर्सचे अध्यक्ष दिपक तळेकर, उपाध्यक्ष संदिप पवार, सचिव श्रीनिवास संगेवार, कोषाध्यक्ष राजेश्वर वासलवार, सल्लागार सदस्य नीरज पारख, कल्याण देशमुख, गिरीश जोशी, संकेत सराफ, माणिक गरूड, शंकर फुटके, सर्वज्ञ पवार, बालाजी तावरे, कल्याण देशमुख, ओमकार भेडसुरकर, राहूल सिरसेवाड, गंगाधर यादव आदी सायकलीश्ट सहभागी झाले आहेत. यांचे स्वागत अँड साखरे, बालाजी टाक, संगमेश्वर फुटके, चंद्रशेखर फुटके, पत्रकार संभाजी मुंडे, स्वानंद पाटील, अनंत कुलकर्णी, प्रा प्रविण फुटके सह शनैश्वर प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते..परळीतील शास्त्रीनगर भागाचे भूमिपुत्र (ह.मु परभणी) सायकलिस्ट शंकर फुटके यांनी नुकतेच सायकलिंगचा १ लक्ष किलो मीटरचा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केला. असा पराक्रम करणारे ते पहिले सायकलिस्ट आहेत.शंकर नागनाथ फुटके यांनी नुकतीच १ लाख किलोमीटर सायकल चालवणे पुर्ण केले. यानिमित्त शंकर फुटके यांचा अँड साखरे व फुटके परिवाराच्या वतीने औक्षण करुन, शाल, पुष्पहार देवून स्वागत करण्यात आले. यावेळी लता फुटके, प्राची फुटके, कलावती फुटके, पद्मिनी फुटके, आशा फुटके उपस्थित होत्या..यासंदर्भात शंकर फुटके यांनी सांगितले की, आम्ही या सायकल वारीच्या माध्यमातून नागरीकांना प्रदूषण रोखण्यासाठी जास्तीत जास्त सायकलचा वापर करा, पेट्रोल ची बचत करा,पर्यावरणाचे संतुलन राखा,पाणी आडवा, पाणी जिरवाचा संदेश गावोगावी या वारीच्या माध्यमातून देत आहोत. 'सायकल चालवा निरोगी राहा' असा ही संदेश देत आहेत. मी स्वतः गेल्या चार वर्षांत एक लाख पेक्षा जास्त किलोमीटर सायकल चालवली आहे. रोज नित्यनेमाने ५०-६० किलोमीटर चालवतो..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.