
परभणी : तिरुपती-साईनगर शिर्डी एक्स्प्रेसमध्ये बुधवारी (ता. २७) पहाटेच्या सुमारास दरोडेखोरांच्या टोळक्याने अक्षरशः धुमाकूळ घातला. पूर्णा ते परभणी दरम्यान सव्वाचार ते पाचच्या सुमारास बोगी क्रमांक ८ व १० मध्ये घुसलेल्या दरोडेखोरांनी प्रवाशांना धारदार शस्त्रांचा धाक दाखवत दागिने व मोबाइल हिसकावून घेतले.