esakal | माहूर गडावर भक्ताविना दैनंदीन पुजाअर्चा
sakal

बोलून बातमी शोधा

aim_bn_1_1458284011.jpg

देशात कोरोना संसर्गाची चर्चा असताना राज्यात सर्वप्रथम माहूर गडावरिल श्री रेणुकादेवी मंदीरात खबरदारी म्हणून केमिकलने सर्व मंदीर दिवसभरातून दोन तिन वेळा धुवुन स्वच्छ करण्यात आले. दर्शन रांग सॅनेटाईज करण्यात आल्या. भाविकांमध्ये सामाजिक अंतर ठेऊन दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती.

माहूर गडावर भक्ताविना दैनंदीन पुजाअर्चा

sakal_logo
By
बालाजी कोंडे


माहूर, (जि. नांदेड) ः महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तीपीठापैकी एक पुर्णपीठ असलेल्या माहूर गडावरिल श्री रेणुकादेवीचे मंदीर (ता.१७) मार्चपासून भाविकांसाठी बंद करण्यात आले आहे. कोरोना विषाणुचा संसर्ग होऊ नये म्हणून संस्थानच्या विश्वस्त समितीने खबरदारी म्हणून मंदीर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मंदीर भाविकांसाठी बंद असले तरी श्री रेणुकादेवीची पुजा, अर्चा, अभिषेक, महाआरती नित्यनेमाने सुरू आहे अशी माहिती विश्वस्त चंद्रकांत भोपी व विश्वस्त संजय कान्नव यांनी दिली आहे.

देशात कोरोना संसर्गाची चर्चा असताना राज्यात सर्वप्रथम माहूर गडावरिल श्री रेणुकादेवी मंदीरात खबरदारी म्हणून केमिकलने सर्व मंदीर दिवसभरातून दोन तिन वेळा धुवुन स्वच्छ करण्यात आले. दर्शन रांग सॅनेटाईज करण्यात आल्या. भाविकांमध्ये सामाजिक अंतर ठेऊन दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती. श्री रेणुकादेवी संस्थान विश्वस्त समितीचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधिश दिपक धोळकिया, सचिव तथा सहाय्यक जिल्हाधिकारी अभिनव गोयल, कोषाध्यक्ष तथा तहसिलदार सिध्देश्वर वरणगावकर, उपाध्यक्ष तथा उपविभागीय पोलिस अधिकारी विलास जाधव, विश्वस्त चंद्रकांत भोपी, विश्वस्त संजय कान्नव, विश्वस्त विनायकराव फांदाडे, विश्वस्त बालाजी जगत, विश्वस्त अरविंद देव, विश्वस्त राजे दुर्गादास भोपी व विश्वस्त समितीने प्रशासनाच्या आवाहनास प्रतिसाद देत श्री रेणुकादेवीचे मंदीर भाविकांसाठी (ता.१७) मार्च पासून पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेऊन त्याची तत्काळ अमंलबजावणी करण्यात आली.


पुजा करण्यासाठी दोन पुजाऱ्यांची नियुक्ती
(ता.१७) मार्च पासून गडावर श्री रेणुकादेवीची नित्यनेमाने पुजा, अर्चा करण्यात येत आहे. श्री रेणुकादेवीची पुजा, अभिषेक, महाआरती करण्यासाठी एक पुजारी आहे, तर आरतीच्या वेळी गाभाऱ्या समोरील सभामंडपात आरती म्हणण्यासाठी एक पुजारी, गोंधळी, झांजवादक, नगारा वादक, घंटीवादक असे सामाजीक अंतर ठेऊन महाआरती करण्यात येते. त्याच बरोबर मंदीर परिसरातील परिसर देवता श्री गणपती, श्री हनुमान मंदीर, श्री तुळजाभवाणी माता, श्री महालक्ष्मी माता, जमदाग्नी, श्री भगवान परशुराम मंदीर येथे पुजा करण्यासाठी दोन पुजाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हेही वाचा -  खाकीला कलंकीत करणारा पोलिस निलंबीत


सुरक्षारक्षक रात्रीच्या सुरक्षेकरिता उपलब्ध
श्री रेणुकादेवी मंदीरावरिल देणगी काऊंटर, साडी- पातळ काऊंटर, पुस्तक विक्री काऊंटर, विडा-तांबुल विक्री काऊंटर पुर्णपणे बंद ठेवण्यात आली आहेत. मंदीर स्वच्छतेकरिता दोन स्वच्छता कर्मचारी आहेत तर मंदीराच्या सुरक्षेकरिता पाच सुरक्षारक्षक दिवसभराकरिता तर दहा सुरक्षारक्षक रात्रीच्या सुरक्षेकरिता उपलब्ध आहेत अशी माहीती विश्वस्त चंद्रकांत भोपी यांनी दिली आहे. कोरोना विषानुने जगभर थैमान घातले आहे. या वैश्वीक महामारीची जगात पंधरा लक्ष लोकांना लागन झाली आहे तर एक लाख लोकांचा जगात आजपर्यंत मृत्यु झाला आहे. हि वैश्वीक महामारी जगावरून दुर व्हावी असे साकडे श्री रेणुकादेवीला घातले जात आहे. त्याचबरोबर ज्यांना या संसर्गाची लागन झाली त्यांचे आरोग्य लवकरात लवकर बरे होवो अशी प्रार्थना देवीला करण्यात येत आहे. त्याचबरोबर भक्ताविना पुजाविधी करण्यात येत आहे असे विश्वस्त चंद्रकांत भोपी व विश्वस्त संजय कान्नव यांनी सांगीतले आहे.

loading image